विदर्भ

राज्यात एक जूननंतर मिळणार कपाशीची बियाणे; मान्सूनपूर्व पेरणीला ब्रेक

रूपेश खैरी

वर्धा : कापूस उत्पादक (Cotton Farming) भागतात काही शेतकरी उत्तम उत्पादनाकरिता साधारणत: मान्सूच्या (Monsoon season) पूर्वी कपाशीची लागवड करतात. मान्सूच्या पाऊसधारा (Monsoon date) बरसण्यापूर्वी हे बियाणे अंकुरत असल्याने या शेतकऱ्यांना उत्पादन घेण्याकरिता बराच काळ मिळतो. परंतु, यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना कपाशीचे बियाणे मिळाले नसल्याने मान्सूनपूर्व पेरणीला ब्रेक लागला आहे. (Cotton seeds will available after 1st June in Maharashtra)

मान्सूनपूर्व पेरणीमुळे कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव अधिक असतो. असे कारण काढून शासनाने यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना कापूस बियाणे विक्री करण्यास बंदी घातली आहे. कापूस बियाण्यांची विक्री 1 जूननंतर करण्याच्या सूचना शासनाच्या आहेत. यामुळे प्रत्येक खरिपात मान्सूनपूर्वी पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा बियाणे मिळाले नसल्याने त्यांची पंचाईत झाली आहे.

कापूस उत्पादक असलेल्या भागात मान्सूनपूर्व पेरणीला मोठे महत्त्व आहे. मान्सून येण्यापूर्वी साधारणत: 10 ते 15 दिवसांपूर्वी कापूस उत्पादक शेतकरी मान्सूनपूर्व पेरणी करतो. यात ओलिताची सोय असलेल्या शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात या पद्धतीचा वापर होतो. अशी पेरणी केल्यास पावसानंतर दिवाळीपूर्वीच या कपाशीला कापूस येतो. यातून उत्तम उत्पादन येत असल्याचे अनेक शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. परंतु, या पद्धतीने केलेल्या पेरणीवर बोंड अळीचा प्रभाव अधिक असल्याचे संशोधकांचे म्हणणे असल्याने कृषी विभागाकडून यंदा शेतकऱ्यांच्या या पारंपरिक प्रयोगाला ब्रेक बसला आहे.

बियाणे उपलब्ध पण विक्री नाही

वर्धा जिल्ह्यात साधारणत: सव्वा दोन लाख हेक्‍टरवर कपाशीची पेरणी होणार आहे. याकरिता बियाणे उपलब्ध झाली आहेत. सध्या आभाळात ढग दाटून आले असल्याने शेतकऱ्यांकडून बियाण्यांकरिता धावपळ सुरू झाली आहे. असे असताना त्यांना कृषी केंद्रातून बियाणे मिळत नसल्याने त्यांची गोची झाली आहे.

सरासरी हजार हेक्‍टरवर मान्सूनपूर्व पेरणी

कापूस उत्पादकांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या वर्धा जिल्ह्यात प्रत्येक खरिपाच्या हंगामात साधारणत: सरासरी एक हजार हेक्‍टरवर मान्सूनपूर्व पेरणी होत होती. यंदा मात्र त्या पेरणीला ब्रेक बसला आहे .

कापसाच्या बऱ्याच व्हेरायट्या उशिरा उत्पादन देणाऱ्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांकडून मान्सूनपूर्व पेरणीला विशेष महत्त्व आहे. ज्यांच्याकडे सिंचनाची सुविधा आहे त्यांच्याकडून या प्रकाराचा वापर होतो. पाऊस आल्यानंतर शेतकरी पेरणीच्या कामी लागेल की बियाण्यांसाठी धावपळ करेल. यामुळे शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करून देण्याची गरज आहे.
- बाळा माऊस्कर, शेतकरी वर्धा
बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे यंदा शासनाकडून 1 जूननंतर कापूस बियाणे विक्रीचा निर्णय घेतला आहे. मान्सूनपूर्व पेरणीमुळे कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे संशोधनातून पुढे आले आहे.
- संजय बमनोटे, मोहीम अधिकारी, जिल्हा परिषद वर्धा

(Cotton seeds will available after 1st June in Maharashtra)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: संविधान नसतं तर..? राहुल गांधींनी फुले आंबेडकरांची आठवण काढत केली RSS वर टीका

0.05 सेकंद, 2 सेंटीमीटर... Trump यांच्यावर गोळीबार; अमेरिकेच्या निवडणुकीचा टर्निंग पॉइंट कसा ठरला?

Supreme Court : तुमच्याकडे कारचे ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर... सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; अनेकांना होणार फायदा

लग्नाच्या १३ वर्षांनंतरही मुल का नाही? सतत एकच प्रश्न विचारणाऱ्यांना प्रिया बापटचं रोखठोक उत्तर, म्हणाली- मी आता..

'या' दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला! कांटे की टक्कर अन् काटाजोड लढती; कोल्हापुरातील 'या' दहा मतदारसंघांत काय स्थिती?

SCROLL FOR NEXT