Crime News Buldhana sakal;
विदर्भ

Crime News Buldhana : पत्नीचा खून करणाऱ्या पतीला दुहेरी जन्मठेप! चारित्र्यावर संशय घेत केला होता खून

सकाळ वृत्तसेवा

बुलडाणा, ता.२१ : चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा चाकूने वार करून खून करणाऱ्यास पतीला बुलडाणा न्यायालयाने दुहेरी जन्मठेपेची शिक्षा व १६ हजार ५०० रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली. गजानन विश्वनाथ जाधव (३५.सा. जालना) असे आरोपीचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, बुलडाणा शहरातील त्रिशरण चौकानजीक असलेल्या जगदंबनगरमध्ये ९ ऑगस्ट २०२१ रोजी ही घटना घडली होती. याप्रकरणी मृत महिलेचे वडील सुरेश दत्तू तायडे यांनी पोलिसात तक्रार दिली होती. तक्रारीनुसार, त्यांची मुलगी पूजा ऊर्फ गीताचा जालना येथील गजानन विश्वनाथ जाधव यांच्यासोबत २०११ मध्ये विवाह झाला होता.त्यांना दोन मुली झाल्या.परंतु, गजानन हा पत्नी गीताच्या चारित्र्यावर संशय घेत, तिला मारहाण करीत होता. या त्रासाला कंटाळून ती माहेरी बुलडाणा येथे आली होती.

दरम्यान तिच्या मागोमाग आरोपी गजानन हाही बुलडाण्यात आला होता.९ ऑगस्ट रोजी दोन मुली घराबाहेर खेळत होत्या. त्या दरम्यान घरात एकटी असलेल्या पत्नीवर आरोपी गजानन याने दोन चाकूने सपासप वार करून तिची हत्या केली होती. पत्नीची हत्या केल्यानंतर गजानन याने त्याच्या बाहेर खेळत असलेल्या दोन्ही मुलांना सोबत घेऊन संगम तलावात उडी मारली होती. परंतु, सुदैवाने तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी तिघांनाही वाचविले होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक सुधाकर गवारगुरू यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

१५ जणांच्या साक्षी महत्त्वाच्या

हे प्रकरण न्यायालयात सुनावणीसाठी आले असता जिल्हा सरकारी वकील वसंतराव लक्ष्मण भटकर यांनी प्रभावी युक्तिवाद करत एकूण १५ साक्षीदार तपासले होते. यासाबेतच घटनास्थळावरील पुरावे, वैद्यकीय पुराव्यांची अॅड.भटकर यांनी सुयोग्य जोड युक्तिवाद दरम्यान दिली. युक्तिवाद ऐकून बुलडाणा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश (दुसरे) एस. बी. डिगे यांनी २० मे रोजी आरोपी गजानन जाधव यास विविध कलमांन्वये तथा पत्नीचा खून, दोन मुलींना जिवे मारण्याचा प्रयत्नासह स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणात दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र, खासदार श्रीकांत शिंदेंनी महाकाल मंदिराचे नियम मोडले; मंदिराच्या गर्भगृहात केला प्रवेश

Chh.Sambhajinagar Assembly Election 2024 : विस्तारित भागांना प्रतीक्षा सुविधांची!

एसी जिममध्ये घाम गाळणाऱ्यांना गश्मीर महाजनीने दिला खास सल्ला; म्हणाला- एका चुकीच्या इन्स्ट्रक्टरमुळे मी...

Latest Maharashtra News Updates : महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांची भेट घेतली

High Court : कब्रस्थान, दफनभूमीची जागा वापरता येईल? रेल्वे उड्डाणपूल प्रकरणी उच्च न्यायालयाची विचारणा

SCROLL FOR NEXT