criminal gangs attack on prison officer Yavatmal  Sakal
विदर्भ

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

सकाळ वृत्तसेवा

Yavatmal News : न्यायाधीन बंदीला प्रतिबंधीत असलेल्या ठिकाणी जाण्यास रोखणाऱ्या कर्मचाऱ्यासह अधिकाऱ्याला त्या बंदीच्या टोळीने मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटनामंगळवारी (ता सात) सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास यवतमाळ जिल्हा कारागृहात घडली.

ओंकार कुंडले वय २२ वर्ष रा. पुणे, जुनेद फारुख शेख वय ३५, सतपाल रुपनवार वय ३५, नयनेश उर्फ नयन निकम वय ३३ वर्ष, आकाश उर्फ गुड्डु भालेराव वय ३० वर्ष, साहेल महेबुब बादशहा शेख वय ४० वर्ष, मनोज शिरशीकर वय २८ वर्ष,

नामदेव नाईक वय २५ वर्ष असे मारहाण करणाऱ्या बंदींची नावे आहे. या प्रकरणी पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार, तुरुंग अधिकारी धनाजी शिवाजीराव हुलगुंडे वय ४२ वर्ष रा. कारागृह अधिकारी वसाहत यांनी याबाबत अवधुतवाडी ठाण्यात तक्रार दिली.

तक्रारीनूसार, मंगळवार न्यायाधीन बंदी ओंकार कुंडले हा कारागृहात प्रतिबंधित असलेल्या क्षेत्रात जात होता. यावेळी कर्तव्यावर असलेले कारागृहातील कर्मचारी सुरज मसराम यांनी त्याला त्या ठिकाणी जाण्यास रोखले.

त्यामूळे बंदी कुंडले हा अरेरावी करीत त्या कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून गेला. तसेच कर्मचाऱ्यांच्या हातातील फायबर लाठी हिसकावून त्यास मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान तुरुंग अधिकारी धनाजी हुलगुंडे यांनी मध्यस्थी करून शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला.

तेव्हा न्यायधीन बंदी कुंडले यांचे अन्य साथीदारांनी दोन्ही शासकीय कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणीत हुलगुंडे यांना डावे हाताचे बोटाला, उजवे हाताचे मनगटाला,

छातीला, मानेला, पाठेला आणि सुरज मसराम यांना मानेला आणि दोन्ही हाताला दुखापत झालेली आहे. घटनेनंतर तुरुंग अधिकारी हुलगुंडे यांनी अवधुतवाडी पोलिस ठाणे गाठून या प्रकरणी रितसर तक्रार दिली. वृत्तलिहीपर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT