PM Crop Insurance Scheme nandura esakal
विदर्भ

Crop Insurance : पिकविम्याच्या नमुना सर्व्हेनुसार नुकसान भरपाई,शेतकऱ्यांना नुकसानीच्या २५ टक्केच रक्कम मिळणार

Crop Insurance : प्रधानमंत्री पिकविमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नुकसानीच्या २५ टक्केच रक्कम मिळणार आहे. नवीन नियमांनुसार वैयक्तिक पंचनामे न करता नमुना सर्व्हेने भरपाई दिली जाणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

नांदुरा : प्रधानमंत्री पिकविमा योजनेअंतर्गत केंद्र सरकारने जारी केलेल्या पत्रकानुसार एका आपत्तीच्या घटनेमध्ये जर २५ टक्क्यांपेक्षा जास्त पूर्वसूचना येत असतील तर अशा ठिकाणी लागू व्हायची नियमावली विमा कंपनीकडून बदलण्यात आली आहे.

७२ तासाच्या सलग कालावधीमध्ये एखादी स्थानिक आपत्तीची घटना घडत असेल तर घटनेअंतर्गत एकूण बाधित क्षेत्राची २५ टक्क्यांपेक्षा जास्त पूर्वसूचना प्राप्त झाल्या असतील तर त्यांचे वैयक्तिक पंचनामे न करता नमुना सर्व्हे केले जाणार आहेत.

या सर्व्हेनुसार येणाऱ्या सरासरी नुकसानीच्या २५ टक्केच रक्कम विमाधारक शेतकऱ्यांना भरपाई स्वरूपात दिली जाणार आहे. अशा प्रकारचा बदल केंद्र सरकारच्या ता.३० एप्रिल २०२४ च्या परिपत्रकाद्वारे केला आहे, त्यामुळे पिकविमाधारक अर्जदार शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या पूर्वसूचनाबाबत पूर्वीप्रमाणे वैयक्तिक पंचनामे करून नुकसानीच्या प्रमाणानुसार नुकसान भरपाई दिली जाणार नाही.

या बदलामुळे पीकविमा धारक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या भरपाईच्या प्रमाणात मोठी कपात झालेली दिसून येणार आहे. दरम्यान २५ टक्के अग्रिम देण्यासाठी मध्यवर्ती नुकसान भरपाईसाठी (मिड सिझन अडव्हर्सिटी) अधिसूचना लागू केलेली आहे.त्यामुळे केंद्राच्या परिपत्रकानुसार वैयक्तिक पंचनामे वेगळे करण्याची आवश्यकता राहणार नाही असे कृषी विभागाने कळविले आहे.

दुसऱ्यांदा पूर्वसूचना द्याव्यात

कृषी विभागाने म्हटल्यानुसार त्या अनुषंगाने यानंतर जर पुन्हा मोठा पाऊस किंवा अतिवृष्टी झाल्यास लाभार्थी पुन्हा विमा कंपनीस पूर्वसूचना देऊ शकतात. जेणेकरून संबंधित लाभार्थी यांना अधिकची नुकसान भरपाई नुकसानीच्या प्रमाणात मिळू शकते, त्यामुळे शेतकरी बांधवांनी अधिकची नुकसान भरपाई मिळवण्यासाठी दुसऱ्यांदा पूर्वसूचना द्याव्यात असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: धक्कादायक! विरोधी उमेदवाराचा प्रचार केला म्हणून तडीपार गुंडांनी हातात कोयते घेऊन माजवली दहशत

Exit Poll : नवा एक्झिट पोल जाहीर, 175 जागांसह नवे सरकार, मुख्यमंत्री कोण होणार ?

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

Aaryavir Sehwag Double Hundred : वीरूच्या लेकाची दमदार खेळी! कुटल्या ३४ चौकार, २ षटकारांसह नाबाद २०० धावा

Gautam Adani: अदानी समुहाला आणखी एक मोठा धक्का! केनिया सरकारने रद्द केले सर्व करार

SCROLL FOR NEXT