विदर्भ

धक्कादायक! एसटी महामंडळाला मोठा आर्थिक फटका; 40 लाखांचे उत्पन्न आले सव्वालाखावर

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : लॉकडाउनचा (Lockdown) सर्वाधिक फटका एसटी महामंडाळा (ST Bus) बसला आहे. लॉकडाउन जाहीर झाल्यापासून राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीचे "शेड्यूल' थांबले आहे. जिल्ह्यात सध्या 20 ते 22 बसगाड्या सुरू आहेत. दर दिवसाला राज्य परिवहन महामंडळाला एक लाख 25 हजार रुपये उत्पन्न मिळत आहे. लॉकडाउनपुर्वी मंडळाचे उत्पन्न 35 ते 40 लाख रुपये मिळत होते. (daily income of ST gets decreased due to lockdown)

कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून राज्य परिवहन महामंडळाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटत आहे. पहिल्या टाळेबंदीच्या काळात तीन महिने संपूर्ण बससेवा बंद होती. आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्रवासी वाहतूक सुरू आहे. परंतु, यात ग्रामीण भागातील बसफेऱ्या पूर्णता बंद असून, लांबपल्ल्याच्या बसफेऱ्यासुद्धा रद्द करण्यात आलेल्या आहेत. टाळेबंदीमुळे बसवाहतुकीला प्रतिसाद मिळत नसल्याने त्यातून एसटीचे उत्पन्नदेखील मोठ्या प्रमाणात घटले आहे.

पूर्वी सव्वालाख किलोमीटरपर्यंत एसटीचा प्रवास होत होता. आता दर दिवसाला पाच ते सहा हजार किलोमीटरच प्रवास होत आहे. त्यामधून एसटी महामंडाळा एक लाख 25 हजार रुपयांचे उत्पन्न होत आहे. वाहतूक करताना अत्यावश्‍यक सेवेतील नागरिकांनाच बसमध्ये प्रवेश देण्यात येत आहे. प्रवासी क्षमतेनुसार वाहतूक सुरू असल्याने कर्मचाऱ्यांना तासन्‌तास प्रतीक्षा करावी लागत आहे.

22 प्रवाशांसाठी दुप्पट तिकीट

बसफेऱ्या कमी असल्याने तासन्‌तास कर्मचाऱ्यांना बसची प्रतीक्षा करावी लागत आहे. 22 प्रवासी असल्याशिवाय महामंडळ बस सोडत नाही. दोन दिवसांपूर्वी असाच प्रकार झाला. कमी प्रवासी असतानाही बस सोडण्यात आली नाही. त्यामुळे आहे, त्या प्रवाशांनाच दुप्पट तिकीट देऊन 22 प्रवाशांची भरती पूर्ण करण्यात आली. चार तासांपासून उभा असलेल्या अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी दोन तिकिटे काढून प्रवास केला.

राज्य परिवहन महामंडळाला कोरोनाच्या कालावधीपासून आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अत्यावश्‍यक सेवेतील नागरिकांनाच प्रवास करायला मिळत असल्याने प्रवासी संख्येत घट झाली आहे.
-श्रीनिवास जोशी, विभाग नियंत्रक, यवतमाळ.

(daily income of ST gets decreased due to lockdown)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Pune: राहुल कुल यांच्या विजयाचा जल्लोष करताना माजी उपसरपंचाचा मृत्यू

Islampur Assembly Election 2024 Results : इस्लामपूर मतदारसंघावर जयंत पाटलांचंच वर्चस्व! निशिकांत पाटलांचा केला 'करेक्ट कार्यक्रम'

Kannad Assembly Election 2024 Result Live: पतीविरुद्धच्या लढतीत पत्नीची बाजी, संजना जाधवांची हर्षवर्धन जाधवांना धोबीपछाड

Shweta Mahale Won Chikhli Assembly Election 2024: चिखली विधानसभेत काँग्रेस विरुद्धच्या थरारक सामन्यात भाजपच्या श्वेता महाले विजयी!

SCROLL FOR NEXT