Amravati Lok Sabha 2024 esakal
विदर्भ

Amravati Lok Sabha 2024: अमरावतीत आंबेडकरी मतांचा घसरता आलेख; मतदारसंघ राखीव असतानाही राष्ट्रीय पक्षांचाच प्रभाव

Amravati Lok Sabha 2024: रिपाइं व बसप या पक्षांचे मताधिक्य मतदारसंघ राखीव झाल्यानंतर घसरल्याचे दिसून आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : लोकसभेच्या निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदारसंघात विक्रमी ३७ उमेदवार रिंगणात आले आहेत. गतवेळी ही संख्या २४ होती तर वर्ष २०१४ मध्ये १९ व २००९ मध्ये २२ इतकी होती. परिसीमन आयोगाने निर्मित केलेला हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला असला तरी आंबेडकरी पक्षांच्या मताधिक्यांचा आलेख मात्र घसरता आहे.

अमरावती लोकसभा मतदारसंघ राखीव होण्यापूर्वी २००४ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत रिपाइंच्या रा. सू. गवई यांनी या मतदारसंघात २२.३ टक्के मते घेतली होती. तर मतदारसंघ राखीव झाल्यानंतर झालेल्या २००९ च्या निवडणुकीत त्यांनी मतांचा टक्का वाढवत तो ३४.५ टक्क्यांवर नेला. या दोन्ही निवडणुकीत त्यांना कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे समर्थन होते. त्यानंतरच्या वर्ष २०१४ च्या निवडणुकीत त्यांचे पुत्र डॉ. राजेंद्र गवई यांनी रिपाइंच्या बॅनरखाली निवडणूक लढवली.

मात्र ते फार मते खेचू शकले नाहीत. त्यांना केवळ ५.४ टक्के मते मिळाली. त्याचवेळी बसपच्या गुणवंत देवपारे यांनी त्यांच्यापेक्षा अधिक मते खेचत ९.८ टक्के मते मिळवली. २०१९ मध्ये रिपाइंने उमेदवार न देता कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारास समर्थन दिले होते. यावर्षीही रिपाइंने (गवई) रिंगणातून माघार घेतली आहे. आंबेडकरी मतांचा मोठा हिस्सा घेणाऱ्या बसपचाही मतांचा आलेख गेल्या तीन निवडणुकीत घसरलेला आहे.

२००९ मध्ये बसपच्या माजी राज्यमंत्री गंगाधर गाडे यांना ५.७ टक्के, २०१४ मध्ये गुणवंत देवपारे यांना ९.८ टक्के व २०१९ मध्ये माजी नगराध्यक्ष अरुण वानखडे यांना केवळ १.१ टक्के मते मिळाली आहेत. प्रत्येक निवडणुकीत बसपने उमेदवार बदलवण्याचा प्रयोग केला. मात्र २०१४ ची निवडणूक वगळता या पक्षाला फार मते खेचता आलेली नाहीत.

याउलट पहिल्यांदाच वर्ष २०१९ मध्ये रिंगणात आलेल्या वंचित बहुजन आघाडीने ५.९ टक्के मते घेत निकाल बदलवण्याची किमया केली. आंबेडकरी चळवळीचा इतिहास असलेल्या अमरावती मतदारसंघात आंबेडकरी पक्षांना निवडणुकीत फार प्रभाव पाडता आलेला नाही. या चळवळीतील मतदार राष्ट्रीय पक्षांकडेच आकर्षित झाले असून राखीव मतदारसंघात आंबेडकरी पक्षांना स्वतःचा उमेदवार निवडून आणता आलेला नाही. (Lok Sabha 2024 Update)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT