नवेगावबांध : पर्यटन संकुलातील हिलटॉप गार्डन. 
विदर्भ

नवेगाव राष्ट्रीय उद्यानातील पर्यटन संकुलाच्या विकासाला ‘खो’... शेकडो युवकांना रोजगाराची प्रतीक्षा

संजीव बडोले

नवेगावबांध (जि. गोंदिया)  : नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानातील पर्यटन संकुल वन्यजीव संरक्षण विभागाच्या ताब्यात आहे. संकुलाच्या विकासासाठी अद्याप या विभागातर्फे पाऊल उचलण्यात आले नाही. तसा कुठलाही प्रस्ताव नाही. त्यामुळे या संकुलाचा विकास रखडला असून, गतवैभवावर अश्रू ढाळत आहे. परिणामी, शेकडो युवक रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, हे पर्यटन संकुल स्थानिक संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या ताब्यात द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे.

केंद्र व राज्य शासनाच्या वतीने पर्यटनातून रोजगारनिर्मिती हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून कोट्यवधी रुपयांच्या अनेक योजना राबविल्या जात आहेत. मात्र, अशा योजनांपासून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेल्या नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानातील पर्यटनस्थळ कोसो दूर आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून हे पर्यटन संकुल स्थानिक वनव्यवस्थापन समितीला देण्यात यावे, अशी मागणी अनेकदा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. परंतु, वनविभाग, वन्यजीव संरक्षण विभागाचे अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या दुर्लक्षितपणामुळे समितीच्या या मागणीकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे गेल्या २२ वर्षांपासून राष्ट्रीय उद्यानाचे पर्यटन संकुल आपल्या गतवैभवावर अश्रू ढाळत आहे.

वनविभाग गोंदियाच्या वतीने चार वर्षांपूर्वी १५ ऑगस्ट २०१६ ला येथे संयुक्त वनव्यवस्थापन समिती गठित करण्यात आली आहे. समितीने १०० युवक-युवतींना पर्यटनासंबंधित प्रशिक्षणही दिले आहे. प्रशिक्षित युवक-युवती आजही रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत.
समितीकडे कोट्यवधी रुपयांचा निधी अखर्चिक आहे. पर्यटन संकुलाच्या विकासासाठी सात कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. याला तीन वर्षे लोटूनही अद्याप विकासकामाला सुरुवात झाली नाही.

पर्यटन संकुलाच्या विकासाबाबत तत्कालीन पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या उपस्थितीत गोंदिया, नागपूर, मुंबई या ठिकाणी शासनस्तरावर अनेक बैठका झाल्या. पर्यटन संकुल संयुक्त वनव्यवस्थापन समितीला हस्तांतरित करण्याचा निर्णयदेखील अनेकदा झाला. बैठका झाल्या. परंतु, पर्यटन संकुलाच्या विकासाची गाडी पुढे सरकतच नाही.

पर्यटन संकुलाचा  विकास रखडला

वनविभाग, वन्यजीव संरक्षण विभाग, महसूल विभाग, पाटबंधारे विभाग, वनविकास महामंडळ असे अनेक विभाग या पर्यटन संकुलाच्या विकासाची निगडित आहेत. होणाऱ्या बैठकांमधून प्रस्ताव तयार करू, आता लवकर होईल, झाल्यातच आहे, असे नेहमीची उत्तरे देऊन समितीची बोळवण अधिकाऱ्यांमार्फत केली जात आहे. आता संकुल पर्यटन विकासाला खो देऊन पक्षी अभयारण्याचा प्रस्ताव पुढे केला जात आहे. त्यामुळे समितीचे पदाधिकारी व गावकऱ्यांत असंतोषाची भावना आहे.

निर्णय होऊनही हस्तांतरण झाले नाही
१९ जुलै २०१८ ला तत्कालीन पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या दालनात झालेल्या बैठकीत ३१ जुलै २०१८ पर्यंत पर्यटन संकुल संयुक्त वनव्यवस्थापन समितीला हस्तांतरित करण्याचा निर्णय झाला. महसूल व वनविभागाने २८ ऑगस्ट २०१८ ला तसा आदेश काढला. तो सध्या वनविभागाकडे अडकला आहे. त्याला त्वरित मंजुरी देण्यात यावी.
- रामदास बोरकर, अध्यक्ष, नवेगावबांध फाउंडेशन.


बेरोजगार हातांना रोजगाराच्या संधी
शासनाने वन्यजीव संरक्षण विभागाकडून पर्यटन संकुल संयुक्त वनव्यवस्थापन समितीला ताबडतोब हस्तांतरित करावे. पर्यटन संकुलाचा विकास म्हणजे परिसरातील बेरोजगार हातांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणे आहे. नवेगावबांध जलाशय व पर्यटन संकुल परिसर पक्षी अभयारण्य घोषित करू नये तसेच या परिसराला संरक्षित राखीव करण्यालाही आमचा विरोध आहे. एक पर्यटनस्थळ म्हणून याचा विकास करावा.
-अनिरुद्ध शहारे, सरपंच, नवेगावबांध.

 


(संपादन : दुलिराम रहांगडाले)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Rathod won in Digras Assembly Election Results 2024: माणिकराव ठाकरेंचा पुन्हा पराभूत, हायव्होल्टेज लढतीत संजय राठोड विजयी

Eknath Shinde : एकनाथ शिंदे महाविकास आघाडीपेक्षा भारी, केलीय आता पुढची तयारी

"त्याने माझ्या तब्येतीची चौकशी केली आणि..." शुटिंगमुळे थकलेल्या सलमानच्या कृतीने भारावली हिना , म्हणाली...

Prakash Solanke won Majalgaon Assembly election 2024 final Result: माजलगावमध्ये अटीतटीच्या लढतीत प्रकाश सोळंके विजयी, शरद पवार गटाच्या उमेदवाराचा पराभव

Ballarpur Assembly Constituency Result 2024 : बल्लारपूरमध्ये भाजपचा गुलाल! सुधीर मुनगंटीवारांनी 105969 मतांनी गड राखला

SCROLL FOR NEXT