Devendra Fadnavis ashish Deshmukh 
विदर्भ

Devendra Fadnavis : आशिष देशमुखांकडे आता सबुरीचाही गुण! पक्षप्रवेशादरम्यान फडणवीसांचं विधान

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : डॉ. आशिष देशमुख यांच्यात नेतृत्व गुण, लोकांना जोडण्याची कला आहे. एक कमतरता होती ती, ती त्यांनी पूर्ण केली. आता त्यांची श्रद्धा भाजपवर असून सबुरीचा गुणही त्यांच्याकडे आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी भाजपमध्ये त्यांचे स्वागत केले.

डॉ. आशिष देशमुख सामान्य व्यक्ती नसून मोठे कलाकार असल्याचे नमूद करीत फडणवीस यांनी त्यांच्यासारखा तरुण, तडफदार आणि राजकारणाची समज असलेला नेता स्वगृही परतल्याचा आनंद व्यक्त केला.

कॉंग्रेसने बडतर्फ केल्यानंतर कोराडी येथे रविवारी डॉ. आशिष देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. व्यासपीठावर जिल्हा भाजपाध्यक्ष अरविंद गजभिये, शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके, डॉ. राजीव पोतदार, आमदार टेकचंद सावरकर, अशोक मानकर, माजी आमदार सुधाकर कोहळे, माजी आमदार मिलिंद माने, माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, माजी आमदार सुधीर पारवे, किशोर रेवतकर, चरणसिंग ठाकूर, संदीप सरोदे, रमेश मानकर आदी उपस्थित होते.

यावेळी फडणवीस म्हणाले, राहुल गांधींनी ओबीसी समाजाचा अवमान केला आणि न्यायालयातही माफी मागण्यासाठी नकार दिला. त्यावेळी डॉ. देशमुख यांनी निडरपणे आपली भूमिका मांडली. त्याचवेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मी त्यांना स्वगृही परत आणले पाहिजे, यावर शिक्कामोर्तब केले. ते सामान्य व्यक्ती नाही. त्यांनी २००९ मध्ये सावनेरमध्ये सुनील केदार यांच्या तोंडचे पाणी पळवले.

२०१४ मध्ये काटोलमध्ये अचानक त्यांना उमेदवारी दिल्यानंतर काकांची रणनिती भेदून त्यांनी विजय खेचून आणला. आता आशिष देशमुख यांनी योग्य मार्ग पकडला असून पुढील आयुष्य भाजपमध्ये घालवतील. याच पक्षात त्यांची प्रगती होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

चुकांकडे दुर्लक्ष करून संधी देण्याची भाजपची विचारधारा ः बावनकुळे

डॉ. देशमुखांच्या भाजप प्रवेशामुळे महाराष्ट्र, विदर्भातील संघटनेला बळ मिळेल. ज्यांच्यात नेतृत्त्वगुण आहे, त्यांना संधी दिली पाहिजे. जीवनात चुका होतात. परंतु चुकीकडे दुर्लक्ष करून संधी देण्याची भाजपची विचारधारा असल्याचे यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. इतिहास बाजूला सारून पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी डॉ. देशमुख साथ देणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी बावनकुळे यांनी ओबीसी समाजासाठी केंद्र सरकारने केलेल्या कामाची माहिती पुस्तिका काढण्याची जबाबदारी डॉ. देशमुख यांच्याकडे दिली.

निवडणूक न लढण्याची डॉ. देशमुखांची घोषणा

पक्षप्रवेशानंतर डॉ. आशिष देशमुख यांनी आमदार किंवा खासदार होण्यासाठी भाजपमध्ये आलो नाही, असे नमूद करीत २०२४ मध्ये लोकसभा किंवा विधानसभा, कुठलीही निवडणूक लढणार नाही, अशी घोषणा केली. केवळ कार्यकर्ता म्हणून विदर्भाच्या हितासाठी काम करण्यासाठी स्वगृही परतल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी कॉंग्रेसचा खरपूस समाचार घेतला. त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे जनसामान्यात मिसळणारे नेते असल्याचे तर उपमुख्यमंत्री फडणवीस विलक्षण व्यक्तिमत्व असल्याचे सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT