यवतमाळ : लोकशिक्षणाचा अभाव असल्याने मल्टिपल स्क्लेरॉसिस (Multiple sclerosis) आजाराची फारशी माहिती जनतेला नाही. या आजाराने प्रभावित रुग्णांची संख्या देशात आहे. मज्जा संस्थेला प्रभावित (Affects the nervous system) करणारा मल्टिपल स्क्लेरॉसिस हा आजार आहे, अशी माहिती प्रसिद्ध मेंदूरोगतज्ज्ञ डॉ. हर्षल राठोड (Neurologist Dr. Hershal Rathore) यांनी दिली. डॉ. राठोड दै. ‘सकाळ संवाद’ कार्यक्रमात बोलत होते. (Diseases affecting the nervous system Multiple sclerosis)
मल्टिपल स्क्लेरॉसिस हा आजार मज्जा संस्थेला प्रभावित करतो. वैद्यकशास्त्रानुसार ऑटो इम्यून संवर्गातील आजार आहे. एम. एस. डिसिज अशा संक्षिप्त नावानेदेखील तो ओळखला जातो. मराठीत त्याला ‘एकाधिक स्क्लेरॉसिस’ असे म्हटले जाते. या आजारात आपली प्रतिकारशक्तीच मज्जा संस्थेवर हल्ला चढवते. प्रतिकारशक्तीच्या या हल्ल्यामुळे मेंदू व मज्जारज्जू यात जे पांढऱ्या रंगाचे सुरक्षाआवरण असते. त्याला क्षती पोहोचून मज्जा संस्थेची संवहनक्षमता मंदावते किंवा त्यात बिघाड होतो, असे डॉ. राठोड यांनी सांगितले.
सुरक्षा आवरणातील क्षतीमुळे स्नायू ताठर होणे, हाता-पायाला मुंग्या येणे, बधिरता येणे, स्नायू ताठर झाल्याने चालायला त्रास होणे, तोल जाणे, शरीराला खाज सुटणे, जळजळ होणे, शरीर अक्रियाशील होणे, लैंगिक समस्या उद्भवणे, क्वचित प्रसंगी अन्न गिळताना व बोलताना त्रास होणे, दृष्टी धूसर होणे, डोकेदुखी, ऐकायला न येणे आदी प्रकारचा त्रास रुग्णाला होऊ शकतो. या आजाराचे नेमके कारण सांगता येत नसले तरी प्रामुख्याने आनुवंशिक व पर्यावरणविषयक घटक या आजाराला कारणीभूत ठरत असल्याचे निदर्शनास आल्याचे डॉ. राठोड यांनी स्पष्ट केले.
मेंदूचा एमआरआय, रक्ततपासणी, सीएसएफ अन्वेषणाद्वारे आजाराचे निदान करता येते. ग्लुको-कॉर्टिकॉइड औषधोपचाराने आजाराची वाढ रोखता येते किंवा त्यामुळे रुग्णाला होणारा त्रास बऱ्यापैकी कमी करता येतो. क्वचितप्रसंगी फिजिओथेरपीचाही लाभ होऊ शकतो. हा आजार बहुतेक सर्वच वयोगटातील व्यक्तींना होत असला तरी २० ते ४० वयोगटातील व्यक्तींना व पुरुषांच्या तुलनेत महिलांना होण्याची शक्यता अधिक असते.- डॉ. हर्षल राठोड, मेंदूरोग तज्ज्ञ, यवतमाळ
(Diseases affecting the nervous system Multiple sclerosis)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.