सेलू (जि. वर्धा) : एकाच कुटुंबातील दोन सख्ख्या चुलत भावांमध्ये शेतातील रस्त्याच्या वादावरून झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला, तर मृताची पत्नी गंभीर जखमी झाली. ही घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास ब्राम्हणी शिवारात घडली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली.
प्राप्त माहितीनुसार, दोघेही घोराडचे रहिवासी असून, एकाच कुटुंबातील आहेत. दोघेही सख्खे चुलतभाऊ आहेत. त्यांच्यात शेतातील रस्त्यावरून वाद सुरू होता. यापूर्वीही या कारणावरून त्यांच्यात वादावादी झाली होती. त्याबाबत पोलिसांत तक्रार दाखल आहे. या रस्त्याबाबत तहसीलदार सेलू यांच्याकडे दाखल प्रकरणात तहसीलदार यांनी रस्ता मोकळा करून देण्याचा आदेशही दिला होती. परंतु, या रस्त्याने जाण्यासाठी मनाई करीत असल्याने हा वाद विकोपाला गेला.
रविवारी बोरनदीला पाणी सोडण्यात आल्याने ब्राम्हणीकडून हे सर्व गावाकडे परत येत असताना पाठक यांच्या शेताजवळ त्यांच्यात पुन्हा वाद झाला. यावेळी झालेल्या मारहाणीत मधुकर खराबे (वय ५८) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी सुनंदा ही गंभीर जखमी झाल्याने उपचारासाठी सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घटनेनंतर आरोपी सुरेश खराबे याने पोलिस स्टेशन गाठून शरणागती पत्करली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी सुरेश खराबे, मंगेश व कृणाल या तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक सुरेंद्र कोहळे तसेच डीबी पथकाचे सचिन वाटखेडे तपास करीत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.