dr sheetal amte husband gautam karajgi departed to pune from anandwan  
विदर्भ

डॉ. शीतल आमटेंचे पती गौतम करजगी मुलासह आनंदवनातून पुण्याला रवाना, पण मुलाचे नाव वरोऱ्याच्या शाळेतच

बालकदास मोटघरे

आनंदवन (जि. चंद्रपूर) :  डॉ. शीतल आमटे करजगी यांच्या आत्महत्येनंतर त्यांचे पती गौतम करजगी, मुलगा शर्विल आणि सासू-सासरे हे सर्व आनंदवन सोडून पुण्याला रवाना झाले. मात्र, ते त्यांनी नेहमीसाठी आनंदवन सोडले की काही दिवसांनी परत येतील, याबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही. 

वरोरा येथील समाजसेवक दिवंगत बाबा आमटे यांची नात तथा महारोगी सेवा समिती आनंदवनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ शीतल आमटे यांचा ३० नोव्हेंबरला मृत्यू झाला होता. यासंदर्भात करजगी व आमटे कुटुंबियांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले होते. या पार्श्वभूमीवर डॉ. शीतल आमटे यांचा घातपात तर झाला नाही ना? असा संशय देखील व्यक्त केला जात होता. त्यांच्या उजव्या हाताला इंजेक्शन घेतल्याची खून असल्याने त्यांनी आत्महत्या केली असल्यास डाव्या हाताने उजव्या हाताला इंजेक्शन टोचले हे स्पष्ट होईल. परंतु, यावरच संशय व्यक्त केला जात असल्यामुळे पोलिस देखील संभ्रमात आहेत आणि ते फॉरेन्सिक व शवविच्छेदन अहवालाची वाट बघत आहेत. आज बुधवार 17  डिसेंबरला  घटनेला अठरा दिवस लोटले असताना पोलिसांना फॉरेन्सिक आणि शवविच्छेदन अहवाल मिळाला नसल्याने पोलीस हतबल दिसत आहेत. फॉरेन्सिक लॅब व अंतिम शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर या मृत्यू प्रकरणाच्या तपासाला गती येणार आहे.

डॉ. शीतल आमटे यांचे पती गौतम करजगी हे आनंदामध्ये अंतर्गत व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. डॉ शीतल यांच्या मृत्यूनंतर ते इथे राहतात की, आनंदवन सोडून बाहेर गावी जातात याविषयी तर्कवितर्क लढविले जात होते. डॉ. शितलचे पती गौतम करजगी यांच्यासह डॉ. शितल यांचे सासू-सासरे आणि मुलगा हे देखील आनंदवनात वास्तव्यास होते. दिनांक १३ डिसेंबर नंतर हे सर्व आनंदवन सोडतील, अशी शंका उपस्थित केली जात होती. तसेच रविवारी शोकसभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी कोरोनाचे कारण देत आमटे कुटुंबीय अनुपस्थित होते. त्यामुळे गौतम करजगी आणि त्यांचे सासू-सासरे नाराज होते, असे बोलले जात आहे. दरम्यान, शीतल यांचे पती, मुलगा आणि सासू सासरे १५ डिसेंबरला आनंदवनमधून बाहेर पडले आणि पुण्याला रवाना झाले. हे कुटुंब नेहमीसाठी बाहेर गावी गेले  की काही दिवसांसाठी हे मात्र कळू शकले नाही. पुण्याला गेल्यावर करजगी कुटुंबातील व्यक्तींकडून आणखी काही गोष्टींचा उलगडा होतो का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुलगा शर्विलची टिसी शाळेतच -
डॉ. शितल आमटे करजगी यांचा मुलगा शविल वरोरा येथील सेंट अनिस पब्लिक स्कूलमध्ये शिकत आहे. करजगी कुटुंबीय शविलला घेऊन पुण्याला गेले असले तरी त्याची टिसी शाळेतच आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : भाजप 100 जागांवर आघाडीवर, सलग तीन निवडणुकांमध्ये केले शतक पार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूर आणि स्नेहा दुबेंमध्ये काट्याची टक्कर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

SCROLL FOR NEXT