cm eknath shinde scold mva political party over shivaji maharaj statue collapse  sakal
विदर्भ

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा आमदार करणार मंत्रालयात उपोषण!

सकाळ डिजिटल टीम

Buldhana Marathi News: मंत्रालय असो की शासकीय कार्यालये, दप्तर दिरंगाई हा मुद्दा नेहमीच चर्चेत येतो. मात्र तो सर्वसामान्यांसाठीच असतो असे काही नाही. सत्ताधारी आमदार संजय गायकवाड यांना देखील मंत्रालयात असाच अनुभव आल्याने त्यांना थेट मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर येत्या १२ तारखेपासून उपोषणाचे हत्यार व उगारावे लागले आहे.

विषय असा आहे, की महाराष्ट्रातील ५६ तालुके अवर्षण प्रवण आहेत. त्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुका हा क्रमांक एकवर आहे. जोवर या तालुक्यांमध्ये रोजगाराच्या संधी व सिंचन प्रकल्प होणार नाहीत, तोवर हा प्रश्न मार्गी लागणार नाही.

भूमिकेतून आमदार संजय गायकवाड यांनी वर्षभरापूर्वी हा विषय मुख्यमंत्र्यांच्या आ. गायकवाड कानावर टाकला. त्यांनी देखील तातडीने बैठक बोलावली. सर्व विभागाचे सचिवांना बोलावून बैठक घेतली. या बैठकीमध्ये सुमारे ३००० कोटी रुपयांची कामे प्रस्तावित केलेली आहेत. मुख्यमंत्र्यांनी या कामांना तत्त्वतः मंजुरी दिलेली आहे.

मंत्रालयात उपोषण

समितीकडून मंजुरात घेणे यासाठी त्या त्या विभागाच्या सचिवांनी पुढाकार घेणे आवश्यक असते. आमदार गायकवाड वेळोवेळी या सर्वांचा पाठपुरावा करतात. गेल्या महिनाभरापूर्वी देखील या जवळपास आठ विभागाच्या सचिवांची बैठक मुख्यमंत्र्यांनी घेतली व ही कामे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना देखील केल्या. मात्र आपण वारंवार चकरा मारूनही मंत्रालयातील अधिकारी त्याकडे गांभीर्याने पाहत नाही.

ही बाब लक्षात घेऊन आमदार गायकवाड यांनीं आता थेट मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर उपोषणाचा निर्णय घेतला आहे. या इशाऱ्याने तरी मंत्रालयातील निर्वावलेले अधिकारी सरळ होतात का ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Vaman Mhatre यांच्या अडचणी वाढणार! FIR व्हायरल केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची पीडित मुलीच्या आईची मागणी

AFG vs SA 1st ODI : अफगाणिस्तानने इतिहास घडवला, दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला

Ajit Pawar यांच्यामुळे आमच्या पक्षाला मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही, रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट

Voter Registration : मतदार नोंदणीसाठी एकाच्याच नावावर भरले तब्बल ४६२ अर्ज, काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT