सावली (जि. चंद्रपूर) : गडचिरोली जिल्ह्यातील तालुक्यांत धुमाकूळ घालणाऱ्या हत्तींच्या कळपाने आता आपला मोर्चा चंद्रपूर जिल्ह्याकडे वळविला आहे. वैनगंगा नदीपात्रातून २७ हत्ती सावली दाखल झाले आहे.
वैनगंगा नदीच्या काळावर असलेल्या सामदा, वाघोलीबुटी आणि सोनापूर या भागात कळप शिरला असून शेतपिकांचे मोठे नुकसान करीत आहे. दरम्यान, हत्तींचा कळप तालुक्यात दाखल झाल्याची माहिती मिळताच वनविभाग अलर्ट झाला आहे. या भागातून हत्तींना हुसकावून लावण्याचे प्रयत्न सध्या वनविभागाचे सुरू आहे.
दीड -दोन वर्षांपूर्वी ओडीसा राज्यातून २७ हत्तींचा कळप गडचिरोली जिल्ह्यात दाखल झाला. या हत्तींच्या कळपाने आरमोरी, चामोर्शी यासह अन्य भागांत धुमाकूळ घातला होता. शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले होते. वनविभागाच्या एका कर्मचारीही हत्तीच्या हल्ल्यात ठार झाला होता.
काही महिन्यांपूर्वी कळपातून भरकटलेले एक-दोन हत्ती ब्रह्मपुरी तालुक्यात दाखल झालेत. त्यांनी नागभीड, सावली आणि सिंदेवाही तालुक्यांत शेतपिकांचे नुकसान केले होते. त्यानंतर हे भरकटलेले हत्ती कळपाला जाऊन मिळाले होते. दोन दिवसांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील वाकडी, सेमाना भागात हत्ती असल्याची माहिती होती.
त्या हत्तीचे अनेकांनी दर्शन घेत त्यांचे व्हिडिओ काढले होते. गडचिरोली जिल्ह्यातील काटली, खरपुंडी, सालईटोली भागातून सेमाना मुडझामार्गे त्यांनी आपला मार्ग बदलला. वैनगंगा नदीतून आता हत्तीचा कळप सावली तालुक्यात दाखल झाला आहे. या कळपाने सामदा, वाघोलीबुटी आणि सोनापुरातील शेतपिकांचे नुकसान केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.