elephants coming from Odisha via Chhattisgarh Affect tendu leaf collection season in Gadchiroli district  
विदर्भ

Gadchiroli News : कधी वाघ, कधी हत्ती...सोसायचे किती? ग्रामस्थ भयछायेत; जंगलात तेंदूपाने संकलन करताना जीव मुठीत!

मिलिंद उमरे

गडचिरोली : जिल्ह्यात अधुनमधुन वाघांचे हल्ले होत असताना आता त्यात ओडीसातून छत्तीसगड मार्गे आलेल्या हत्तींचीही भर पडली आहे. त्यामुळे सर्वांत महत्त्वाचा आणि आर्थिक बळ देणारा तेंदूपत्ता संकलनाचा हंगामही अडचणीत आला आहे. जंगलात तेंदूपाने तोडण्यासाठी जीव मुठीत घेऊन जावे लागत असल्याने हे हत्ती आणि वाघांचे संकट आम्ही आणखी किती काळ सोसायचे, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

सध्या अनेक भागांत तेंदूपत्ता संकलनाचा हंगाम सुरू आहे. मजूर तेंदूपानासाठी जंगलात जात आहेत. अशातच जंगल परीसरात वाघांसह रानटी हत्तींचा व इतर हिंस्त्र प्राण्यांचा वावर आहे. अशावेळी तेंदूपत्ता तोडणीसाठी जंगलात गेलेल्या नागरिकांना वन्यप्राण्यांपासून धोका होण्याची शक्यता आहे. सध्या हत्तींचा कळप वडसा वनविभागातील कुरखेडा तालुक्याच्या परीसरात आहे.

जिल्ह्यात तेंदूपाने संकलनाला काही दिवसांपासून सुरुवात झाली आहे. ग्रामीण भागात तेंदूपाने संकलनातून मजुरांना काही अंशी रोजगार उपलब्ध झाला आहे. तेंदूपाने संकलनासाठी ग्रामीण भागातील मजूर पहाटेपासून गावाजवळच्या जंगल परिसरात जातात तेंदूपत्ता गोळा करताना जंगलातील वाघ, बिबट, अस्वल, रानडुक्कर व जंगली हत्तींपासून धोका निर्माण होऊन जीवितहानी होण्याची शक्यता असते.

वाघाच्या हल्ल्यात गेल्या दोन- तीन वर्षांत अनेक नागरिकांचा बळी गेला असल्याने नेहमी मानव व वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष पाहायला मिळत आहे. रानटी हत्तींनीसुद्धा नागरिकांना ठार केले आहे. एका नर हत्तीने तर तेलंगणात प्रवेश करत तिथेही दोन लोकांना ठार केले. अधिकाधिक तेंदूपाने मिळावीत, यासाठी अनेकजण दाट रानात जातात तिथे वन्यजीवांकडून धोका होण्याची शक्यता असते. १४ मे २०२४ रोजी गडचिरोली शहरापासून १५ किमी अंतरावर असलेल्या आंबेशिवणी गावानजिकच्या जंगलात तेंदूपाने संकलित करत असलेल्या पार्बता बालाजी पाल या ६२ वर्षीय वृद्ध महिलेला वाघाने ठार केले होते. दोनच दिवसांना धानोरा तालुक्यातील खसोळा गावातील जंगलात वडीलांसह तेंदूपत्ता तोडत असलेल्या हर्षद गणपत पदा या १४ वर्षांच्या मुलावर अस्वलाने हल्ला करून जखमी केले. अशा घटना सातत्याने घडत असून वन्यजीवांच्या हल्ल्यांच्या भयछायेत नागरिकांना जगावे लागत आहे.

ना शेतात जाता येत, ना रानात...

पूर्वी वन्यजीवांचा धोका फक्त जंगलातच असायचा. मोह संकलन, तेंदूपत्ता संकलन करताना वन्यजीवांच्या हल्ल्याच्या घटना घडायच्या. पण जिल्ह्यात वाघांचे हल्ले वाढू लागले आणि रानटी हत्तींचे आगमन झाले तेव्हापासून शेत व गावाचा परीसरही सुरक्षित राहिलेला नाही. वाघांनी अनेकदा शेतात काम करत असलेल्या ग्रामस्थांना ठार केले आहे. रानटी हत्तींनी गावात घुसून घरांचे नुकसान केले आहे. त्यामुळे नागरिकांना शेतातही जाता येत नाही आणि रानातही जाता येत नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT