washim farmer.jpg 
विदर्भ

खरिपासाठी बळीराजा सज्ज; या जिल्ह्यात असे आहे पेरणीचे नियोजन, सर्वाधीक क्षेत्रावर सोयाबीन लागवडीचा अंदाज

दत्ता महल्ले

वाशीम : खरीप हंगाम तोंडावर आला आहे. त्यामुळे जिल्हा कृषी विभागाकडून जिल्ह्यातील खरीप हंगामात होणार्‍या पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात एकूण चार लाख सहा हजार 234 हेक्टवर खरीप पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये जिल्ह्यात सर्वाधीक 73.95 टक्के क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा होणार असल्याचा अंदाज जिल्हा कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील शेती ही प्रामुख्याने पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहे. त्यामुळे खरीप हंगाम शेतकर्‍यांसाठी फार महत्त्वपूर्ण ठरतो. जिल्ह्यातील शेतकरी वर्ग कोरडवाहू जमिनीमध्ये सोयाबीन, तूर या मिश्र पिकांच्या लागवडीला पसंती देतात. त्यामुळे जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा देखील सर्वाधीक असतो. 2020-21 या वर्षाच्या खरीप हंगामातील पेरणीच्या नियोजनामध्ये जिल्ह्यात तीन लाख 417 हेक्टवर सोयाबीनचा पेरा केला जाणार आहे. 

याची टक्केवारी ही तब्बल 73.95 टक्के एवढी आहे. त्या पाठोपाठ तूर 13.42 टक्के क्षेत्रावर, कापूस 4.74 टक्के क्षेत्रावर, उडीद 2.51 टक्के, खरीप ज्वारी 2.24 टक्के, मूग 2.04 टक्के, इतर पिके 1.11 टक्के क्षेत्रावर पेरली जाण्याचा अंदाज कृषी विभागाच्या पेरणी अहवालात नमूद करण्यात आला आहे.

खरीप हंगामाची स्थिती
एकूण क्षेत्र (हेक्टर)...........513124
खरीप लागवडीखालील क्षेत्र...406234
शेतकरी खातेदार संख्या ......277242

प्रमुख पीक निहाय नियोजीत क्षेत्र
पीकाचे नाव
सोयाबीन
कापूस
तूर
मूग
उडीद
खरीप ज्वारी
इतर पिके
एकूण

क्षेत्र (हेक्टर)
300417
19245
54510
8272
10180
9103
4507
406234

टक्केवारी
73.95
04.74
13.42
02.04
02.51
02.24
01.11
100.00

बियाणे व खतांची स्थिती
निविष्ठा प्रकार
बियाणे (क्विंटल)
खते (मेट्रिक टन)

लक्षांक   उपलब्धता   टक्केवारी
74538   30685        41.17
56290   33753        59.96

खरीप ज्वारी पेरणीत वाढ; कपाशी लागवड घटीचा अंदाज
जिल्ह्यात खरीप हंगाम 2019-20 मध्ये खरीप ज्वारी 1681 (0.43 टक्के) हेक्टर क्षेत्रावर खरीप ज्वारी पेरणीचा अंदाज व्यक्त केला होता. तर आगामी 2020-21 या खरीप हंगामात खरीप ज्वारी पेरणीचा अंदाज 9103 (2.24 टक्के) क्षेत्रावर पेरणीचा अंदाज नमूद केला आहे. जिल्ह्यात गत खरीप हंगामात कपाशी लागवडीचा अंदाज 25 हजार 992 (6.58 टक्के) हेक्टरवर नमूद करण्यात आला होता. तर यंदा खरीपात कपाशी लागवडीचा अंदाज 19 हजार 245 (4.74) टक्के क्षेत्रावर नमूद करण्यात आला आहे. त्यामुळे हे कपाशी लागवडीचे क्षेत्र गत खरीप हंगामातील क्षेत्राच्या तुलनेत कमी होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

कृषी निविष्ठांचा देखील वारंवार आढावा
खरीप हंगाम 2020-21 च्या पेरणीचे कृषी विभागाकडून पूर्ण नियोजन करण्यात आहे. त्या दृष्टीने कृषी निविष्ठांचा देखील वारंवार आढावा घेतला जात आहे. जेणेकरून शेतकरी बांधवांना कोणत्याही प्रकारची अडचण येता कामा नये. त्यानंतरही कोठे शेतकरी बांधवांना बियाणे, खते खरेदी करताना अडचणी आल्यास त्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधावा. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता शासनाने नेमुन दिलेल्या सूचनांचे शेतकरी बांधवांनी पालन करावे.
-एस. एम. तोटावार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशीम

अडचण-तक्रार असल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा
जिल्ह्यात कृषी विभागाकडून खरीप हंगाम 2020-21 चे पूर्ण नियोजन करण्यात आले आहे. त्या दृष्टीने कृषी विभागाकडून खते-बियाणे खरेदी करताना कोणतीही अडचण जावू नये या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. शेतकरी बांधवांनी खते, बी-बियाणे खरेदी करताना अधिकृत कृषी सेवा केंद्राकडूनच खरेदी करावी, खरेदी केलेल्या मालाची पक्की पावती घ्यावी, खते-बियाण्यांसंदर्भात काही अडचण-तक्रार असल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता तोंडाला मास्क, सोशल डिस्टसिंगचे पालन करूनच खते, बियाण्यांची खरेदी करावी.
-व्ही. एस. बंडगर, जिल्हा कृषी विकास अधिकारी, वाशीम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT