Love Jihad esakal
विदर्भ

Love Jihad Case : फेसबुकच्या माध्यमातून पुलगावात लव्ह जिहाद; पीडितेला मारहाण करून 'समृद्धी'वर फेकले

हिंदू नावाने ओळख सांगत मुस्लिम समाजातील युवकाने हिंदू मुलीशी लग्न केले. त्यानंतर तिच्यावर धर्मांतराची जबरदस्ती केली.

सकाळ वृत्तसेवा

वर्धा - हिंदू नावाने ओळख सांगत मुस्लिम समाजातील युवकाने हिंदू मुलीशी लग्न केले. त्यानंतर तिच्यावर धर्मांतराची जबरदस्ती केली. हा प्रकार वर्धेतील पुलगाव येथे घडला. या प्रकरणी पुलगाव पोलिसांनी पीडितेची तक्रार दाखल करून घेतली नाही. पुलगावात घडलेल्या लव्ह जिहाद प्रकरणात पोलिसांनी दोषी युवकाला अटक करावी आणि अधिकाऱ्यांची दिशाभूल करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी अशी मागणी खासदार अनिल बोंडे यांनी पत्रकार परिषदेत केली.

पुलगाव येथील एका युवतीशी फेसबुकवरून संचित अग्रवाल नामक युवकाने ओळख केली. यातून दोघांत प्रेम झाल्याने त्यांनी वर्धेत येत मंदिरात लग्न केले. लग्नानंतर काही कारण काढून सदर युवक पुलगाव येथे त्या युवतीच्या घरी राहू लागला. अशात एक दिवस तो घरी लपून नमाज पठण करताना दिसला. यावरून तो हिंदू नसल्याचे पुढे आले. त्याला विचारणा केली असता त्याने दंगे घडण्याचे कारण आणि कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली.

अशात तो दुसऱ्या मुलीशी विवाह करणार असल्याचे पुढे आल्याने सदर युवती पोलिसात तक्रार दाखल करण्याकरिता गेली. मात्र, पोलिसांकडून तिला सहकार्य मिळाले नसल्याचा आरोप खासदार बोंडे यांच्यासह पीडितेने यावेळी केला. लग्नाच्या कारणानंतर सदर युवतीने त्याला भेटायला बोलावले असता त्याने एकट्यात भेटायचे म्हणून तिला बडनेरा येथे नेले.वाहनात तिला बुरखा घालण्यास सांगून तिचा धर्म परिवर्तन करण्याचा घाट घातला.

तिने नकार दिल्यानंतर तिला जबर मारहाण करून समृद्धी महामार्गावर फेकण्यात आले. येथून पुलगावात आल्यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्याकरिता गेली असता पोलिसांनी तिची तक्रार घेतली नसल्याचा आरोपही यावेळी पीडितेसह खासदार बोंडे यांनी केला.पत्रकार परिषदेला भाजप जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, राजेश बकाने, वैशाली येरावार यांची उपस्थिती होती.

२०२४ मध्ये नोटरी

पीडिता आणि यातील युवक या दोघांनी २०२४ मध्ये सोबत राहण्याची नोटरी केली. ती दोन महिन्याची गर्भवती होती आणि तिच्या कुटुंबीयांना मारण्याची धमकी देण्यात आल्याने यावर स्वाक्षरी केल्याचे पीडितेने यावेळी सांगितले.

पोलिस विभागाने मान्य केली चूक

या प्रकरणात युवकाने आपला धर्म लपवून युवतीची फसवणूक केली. यामुळे यात फसवणुकीचा आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी युवतीची होती. मात्र, पोलिसांकडून तसा कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. याबाबत पोलिस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी चूक झाल्याचे मान्य केल्याची माहिती खासदार बोंडे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींच्या नागपूरमधील रॅलीत मोठा राडा, काॅंग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले अन्....

"Fake Narrative फार काळ टिकत नाही"; पंतप्रधान मोदींनी केलं विक्रांत मेस्सीच्या द साबरमती रिपोर्टचं कौतुक

Latest Maharashtra News Updates live : महाराष्ट्रात चोरांचे सरकार,मल्लिकार्जुन खर्गेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT