Tur Bajar Bhav  
विदर्भ

Tur Bajar Bhav : शेतकऱ्यांची भाववाढीची प्रतीक्षा संपली! तुरीला दहा हजार रुपये भाव

सकाळ डिजिटल टीम

Amravati: आगामी हंगामासाठी केंद्राने पिकांचे हमीदर जाहीर केल्यानंतर व आता हंगाम सुरू झाला असताना सोयाबीन आणि कापसाचे दर मात्र घसरलेलेच आहेत. तुरीला झळाळी मिळत असली तरी आवक त्यातुलनेत कमी आहे. या उलट भाव वाढतील या अपेक्षेने आवक रोखून धरलेल्या शेतकऱ्यांनी आता सोयाबीन व कापूस बाजारात आणला आहे.

सरत्या खरीप हंगामात सोयाबीन व कापसाला खुल्या बाजारात अपेक्षित दर मिळू शकले नाहीत. भाव वाढतील, या प्रतीक्षेत शेतकऱ्यांनी आवक रोखून धरली खरी, मात्र त्यांच्या पदरी निराशाच पडली. गेल्या खरिपात अतिवृष्टी व संततधार पावसाने सायोबीनचे अतोनात नुकसान केले. उत्पादनाची सरासरी घसरण्यासोबतच प्रतवारीतही घसरण आली.

मागणी व पुरवठ्याचे समीकरण असंतुलित झाले असतानाही सोयाबीनला या हंगामात चढे दर मिळाले नाहीत. हमीदराच्या तुलनेत ४०० ते ५०० रुपये वाढ मिळाली. मंगळवारी स्थानिक बाजार समितीत सोयाबीनला ४७०० ते ४८८१ रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. एक वर्षापूर्वी ८ ते १० हजारांचा टप्पा गाठणाऱ्या सोयाबीनची या हंगामात मात्र वाताहत झाली.

भाव वाढतील या अपेक्षेने शेतकऱ्यांनी आवक रोखून धरली होती, आता नवा हंगाम सुरू होत असल्याने त्याचा संयम सुटू लागला असून बाजारातील सोयाबीनची आवक वाढली आहे. मंगळवारी ५३१० पोत्यांची आवक नोंदविण्यात आली.

सोयाबीनप्रमाणे कापसाच्या शेतकऱ्याचीही स्थिती झाली आहे. गतवर्षी दहा हजारांवर गेलेला कापूस यंदा आठ हजारांवर टप्पा गाठू शकला नाही. वार्षिक पीक असलेल्या कापसावर शेतकऱ्यांचे अर्थचक्र अवलंबून आहे. यावर्षी मात्र त्याचे बाजारात मिळालेल्या निचांकी दराने अर्थचक्र बिघडले. मंगळवारी स्थानिक बाजारात कापसाला प्रति क्विंटल ७४०० रुपये भाव होता.

तुरीने मात्र शेतकऱ्यांच्या खिशात पैसा दिला असला तरी तूर आंतरपीक असल्याने त्याचा लाभ कमी शेतकऱ्यांना मिळाला.

प्रतीक्षा करून थकल्याने आवक वाढविली

गेल्या वर्षीचा अनुभव लक्षात घेत आज ना उद्या भाव वाढतील, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी सोयाबीन व कापसाची आवक रोखून धरली होती. गरजेपुरताच तो आवक आणत होता. आता सातत्याने भावातील घसरण बघता शेतकरी भाववाढीची प्रतीक्षा करून थकला, आता नवा हंगाम सुरू होत असल्याने आर्थिक तजवीज करण्यासाठी त्याने आवक सुरू केली आहे.

-राजेश पाटील, अडत व खरेदीदार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

SCROLL FOR NEXT