farmer killed in tiger attack Incidents in nagbhir forest fear among farmers Sakal
विदर्भ

Gadchiroli : वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार; नागभीड वनपरिक्षेत्रातील घटना, शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण

सकाळ वृत्तसेवा

तळोधी : शेतात काम करीत असलेल्या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना नागभीड वनपरिक्षेत्रात मंगळवार (ता. २३) दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली. मृत शेतकऱ्याचे नाव दोडकूजी शेंद्रे (वय ६० रा. मिंडाळा ता. नागभीड) असे आहे.

नागभीड तालुक्यात येत असलेल्या मिंडाळा येथे दोडकूजी शेंद्रे राहतात. त्यांची शेती बागलमेंढा परिसरात आहे. हा भाग जंगलाने व्याप्त आहे. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात वाघाचा वावर आहे. नेहमीप्रमाणे दोडकू शेंद्रे दुपारच्या सुमारास शेतात काम करीत होते.

याचदरम्यान वाघाने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. वाघाने त्यांना जंगलाच्या दिशेने ओढत नेत ठार मारले. शेतात दोडकू शेंद्रे दिसत नसल्याचे पाहून बाजूला काम करीत असलेले शेतकरी, मजुरांनी शोधाशोध सुरू केली. मात्र, त्यांना दोडकू दिसले नाही. त्यामुळे त्यांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना या घटनेची माहिती दिली.

माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. वनकर्मचाऱ्यांनी जंगलात जात शोध घेणे सुरू केले. जंगलात त्यांना दोडकू शेंद्रे यांचा मृतदेह दिसून आला. त्यांच्या बाजूला वाघ होता. वाघाला पिटाळून लावण्यात आले. त्यानंतर प्रेत ताब्यात घेण्यात आले.

शेतीचा हंगामावर श्वापदांचे सावट

सध्या शेतीचा हंगाम सुरू आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर धानाचे पीक घेतल्या जाते. पाऊस चांगला पडल्याने शेतकामांना वेग आला आहे. हा भाग जंगलव्याप्त आहे. गेल्या काही दिवसांपासून वाघाचे दर्शन नागरिकांना होत आहे. त्याच मंगळवारी एका वृद्ध शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून ठार केले. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

दोन अस्वलांच्या हल्ल्यात शेतमजूर गंभीर जखमी

दोन अस्वलांच्या हल्ल्यात ४० वर्षीय शेतमजूर गंभीर जखमी झाल्याची घटना आज २३ जुलै रोजी बोरखेड शिवारात घडली. या अस्वलांनी शेतमजुराचा जबडा फाडला आहे. जखमी शेतमजुरावर बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

पलढग (कोमलवाडी) येथील शेतमजूर रमेश तुळशीराम बर्डे (४०) हे आज २३ जुलैच्या दुपारी एक वाजताच्या सुमारास बोरखेड शिवारातील शेतातून पलढग (कोमलवाडी) येथे जात होते. यावेळी बोरखेड शिवारातील बिट नंबर ३१३ मध्ये अचानक दोन अस्वलांनी त्यांच्यावर हल्ला केला.

या हल्ल्यात रमेश बर्डे हे गंभीर जखमी झाले असून, अस्वलांनी त्यांचा जबडा पूर्णपणे फाडला आहे. दरम्यान, बर्डे यांची आरडा-ओरड ऐकून परिसरातील शेतकरी व शेतमजुरांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यामुळे दोघा अस्वलांनी तेथून पळ काढला.

जखमी रमेश बर्डे यांना उपचारासाठी बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच बुलडाणा वनपरिक्षेत्र अधिकारी अभिजित ठाकरे, वनरक्षक जोगदंड, वनपाल प्रफुल्ल मोरे, वनमजूर देविदास बावस्कर, वसंता सावळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व शेतमजुरांसह नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT