तिवसा (जि. अमरावती) : सध्या उन्हाळा सुरू आहे असं म्हणतात. कारण, आज कडक उन्ह तर उद्या पाऊस येतो. यामुळे अनेकांच्या मनात उन्हाळ्याविषयी प्रश्न निर्माण होत आहे. असेच चित्र मागील काही दिवसांपासून सुरू आहे. हा पाऊस उन्हाळ्यात दिलासा देणारा वाटत असला तरी शेतकऱ्यांसाठी तसेच कोरोनामुळे नागरिकांसाठी मोठा घातक ठरणारा आहे. पावसात कोनोना अधिक पसरतो असा अंदाज आहे. दुसरीकडे याच पावसाने एका कुटुंबाला दुखाच्या डोंगराखाली ठकललं आहे.
जगासह देशात सध्या एकच विषय चर्चेला जात आहे, तो म्हणजे कोरोना... कोरोनाने आजवर अनेकांचा मृत्यू झाला असून, अनेकांना लागण झाली आहे. आपल्या देशातही याचा चांगलाच फैलाव झाला आहे. एकट्या विदर्भाची गोष्ट केली तर सर्वाधिक रुग्ण नागपुरात आढळून आले आहेत. तर सर्वाधिक रुग्ण अमरावती जिल्ह्यात झाले आहेत. यामुळे नागरिक चांगलेच भयभीत झाले आहेत. एकीकडे कोरोना दुसरीकडे अवकाळी पाऊस येत असल्याने शेतकरी चांगलाच हवालदिल झाला आहे. काय करावे आणि काय नाही, असाच प्रश्न त्यांच्या मनात उपस्थित होत आहे.
नर्मदा जानराव मुंदरे (वय 65, रा. उंबरखेड) या गुरुवारी (ता. 7) सकाळीच पती आणि मुलासह शेतात कांदा वेचणीसाठी गेल्या होत्या. काही अंदरावर तिघेही कांदा वेचण्याचे काम करीत होते. मात्र, दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास अचानक मेघगर्जनेला सुरुवात झाली. काही वेळातच जोरदार पावसाला सुरुवात झाली. तसेच वादळही होते. दरम्यान, दूर असलेल्या नर्मदा यांच्या अंगावर वीज कोसळली. अंगावर वीज कोसळताच त्यांचा घटनास्थहीच तडफडून मृत्यू झाला.
तिघेही काही अंतरावर कांदा वेचत होते. वादळ आणि वारा सुरू असतानाही त्यांनी कांदा वेचणे बंद केले नाही. अशातच कोसळलेल्या विजेने नर्मदा यांचा मृत्यू झाला. ही बाब लक्षात येताच पती व मुलाने धाव घेतली. काहीही करण्याच्या आधीच नर्मदा यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. यानंतर घटनेची माहिती तिवसा पोलिसांना देण्यात आली. तिवसा ग्रामीण रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठविला होता.
कोरोनामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. बॅंक, सावकार तसेच इतरांकडून शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन शेती केली. त्यांच्या मेहनतीचे फळही त्यांना मिळायला लागले. शेतात पीक, भाज्या व फळ लागले. मात्र, कोरोनाने त्यांना आपला माल विकता आला नाही. नाइलाजाने त्यांना अपला शेत माल फेकावा लागला. दुसरीकडे येणाऱ्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडून ठेवले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.