favarani_ 
विदर्भ

कीटकनाशक फवारणीमुळे होताहेत शेतकरी बाधित

सुरज पाटील

यवतमाळ : खरीप हंगामात कपाशी व सोयाबीनचे उत्पन्न घरात येण्याची प्रतीक्षा सुरू असतानाच किडीचे आक्रमण होत आहे. त्यापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी कीटकनाशक औषधांची फवारणी करीत आहेत. मिक्‍स औषध फवारले जात असल्याने शेतकरी बाधित होत आहेत. या हंगामात आतापर्यंत ६२ शेतकरी, शेतमजूर बाधित झाले आहेत.

कोरोना विषाणूचा उद्रेक सुरू असतानाच शेतकरी आर्थिक अडचणींवर मात करून खरीप हंगामाच्या तयारीला लागले. त्यातही सोयाबीन बियाणे बोगस निघाल्याने दुबार पेरणीची वेळ आली. अतिपावसामुळे सोयाबीन व कपाशी पिकांवर रोगाचे आक्रमण झाले. पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी कीटकनाशक औषध फवारणीचा पर्याय निवडला. मात्र, फवारणीबाबत शेतकरी व शेतमजूर अजूनही अनभिज्ञ आहेत.

तांत्रिकदृष्ट्या फवारणी कशी करावी, याचे गांभीर्यपूर्वक मार्गदर्शन कृषी विभागाकडून करण्यात आलेले नाही. त्यामुळे फवारणी करताना बाधित होण्याचे चक्र सुरूच आहे. ६२ बाधितांवर येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार करण्यात आले. राळेगाव तालुक्‍यातील एका बाधिताचा शासकीय रुग्णालयात तर, एकाचा परजिल्ह्यात मृत्यू झाला. मात्र, प्रशासनाकडे दोन्ही मृत्यूंची नोंद नाही.

जिल्ह्यातील बाधित शेतकरी, शेतमजूर चंद्रपूर, नांदेड, सावंगी (मेघे), सेवाग्राम येथे उपचारासाठी धाव घेत आहेत. शेतकऱ्यांनी फवारणी करताना केंद्रीय कीटकनाशक मंडळ फरीदाबाद यांनी शिफारस केलेल्या औषधांचा वापर काळजीपूर्वक करणे आवश्‍यक आहे. वेगवेगळी रसायने मिसळून फवारणी करणे टाळायला पाहिजे. फवारणी करताना डोळ्यावर गॉगल, हातमोजे, मास्क, डोक्‍यावर टोपी, ऍप्रोन, बूट घालूनच फवारणी करावी. शेतमजूर सलग फवारणी करतात, हे चुकीचे आहे. योग्य काळजी घेतल्यास बाधा टाळता येऊ शकते.

सविस्तर वाचा - जाणून घ्या वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार कोणत्या भारतीयाला मिळाला!

रुग्ण उपचारासाठी दाखल
कोविडसह इतरही आजाराचे रुग्ण उपचारासाठी येत आहेत. आतापर्यंत ६२ फवारणीबाधित उपचारासाठी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झालेत. उपचारानंतर बरे झालेल्यांना सुटी देण्यात आली.
डॉ.मिलिंद कांबळे
अधिष्ठाता, वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ


सुरक्षा किटचा अभाव
फवारणी करताना सुरक्षेसाठी शेतकरी व शेतमजुरांनी सुरक्षा कीट वापरणे आवश्‍यक आहे. मात्र, सुरक्षा कीट उपलब्ध करून दिली जात नाही. सुरक्षेच्या कोणत्याही साधनांचा वापर न करता करण्यात येणारी फवारणी धोकादायक ठरत आहे.

संपादन - स्वाती हुद्दार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT