farmers facing problems due to no cotton selling in digras of yavatmal 
विदर्भ

एकेकाळी दिग्रसमध्येच खुलायचे भाव, पण आता शेतकऱ्यांना कापूसविक्रीसाठी कापावे लागणार ३५ किलोमीटर अंतर

सुनील हिरास

दिग्रस (जि. यवतमाळ) : कापसाची मोठी बाजारपेठ म्हणून दिग्रसचा नावलौकिक होता. एकेकाळी मराठवाडा व विदर्भाच्या कानाकोपऱ्यांतून कापूस विक्रीसाठी दिग्रसला येत होता. एवढेच नव्हे, तर देशातील कापसाचे भाव हे दिग्रसवरून खुलायचे. मात्र, दिग्रसमध्ये शासकीय कापूस खरेदी केंद्र नसल्याने दिग्रसच्या शेतकऱ्यांना आता 35 किलोमीटरवरील अंतरावर असलेल्या बोरगाव दाभडी येथे कापूस विकी करा, असे फर्मान आले आहेत. त्यामुळे एकप्रकारे ही तालुक्‍यातील शेतकऱ्यांची थट्टाच असल्याचा आरोप होत आहे.

यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे सोयाबीन व कापूस उत्पादनात घट आली आहे. बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागले. त्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे हाताला आलेली पिके हातातून निघून गेलीत. त्यात कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाउनमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. तालुक्‍यात कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. अनेकांना कापसाचे भरघोस उत्पन्न झाले. त्यामुळे शासनाची कापूस खरेदी सुरू होईल, याची वाट शेतकरी आतुरतेने पाहत होते. दिग्रस येथील बाजार समितीत आपला कापूस विकता येईल, हे स्वप्न उराशी बाळगून असतानाच मात्र दिग्रस येथील शेतकऱ्यांची कापूस खरेदी होणार नाही. शेतकऱ्यांना आता आपला कापूस दिग्रसपासून 35 किलोमीटर अंतरावर असलेल्या बोरगाव दाभडी येथे विकण्याचे फर्मान निघाले आहेत. 

दिग्रस येथील वडवाला जिनिंग क्रमांक एक व क्रमांक दोन हे दोन्ही जिनिंग मराठवाडा व विदर्भात प्रसिद्ध होते. या दोन्ही जिनिंगमध्ये लाखो क्विंटल कापूस ठेवण्याची व त्यावर प्रक्रिया करण्याची मुभा होती. परंतु, सध्याच्या परिस्थितीत हे दोन्ही जिनिंग बंद असून, अखेरच्या घटका मोजत आहेत. त्यामुळेच दिग्रसच्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बोरगाव दाभडी येथे कापूस विक्रीसाठी न्यावा लागत आहे. शेतकऱ्यांना दाभडीत पाठविण्यात येत असल्याने नाराजीचा सूर उमटत आहे. पूर्वी वडवाला जिनिंग व बाजार समितीत कापसाने भरलेली वाहने दिसायची, यंदा चित्र वेगळेच दिसून येत आहे.

सहकार क्षेत्र आले डबघाईस -
दिग्रसच्या सहकार क्षेत्राची भरभराट व्हावी, हा उद्देश दिग्रसच्या पुढाऱ्यांनी कधीच ठेवलेला दिसत नाही. विशेष म्हणजे सहकार क्षेत्रातील पुढाऱ्यांनी केवळ वैयक्तिक हेतू साध्य करून घेतला आहे. त्याचाच विपरीत परिणाम म्हणून आजच्या घडीला दिग्रस तालुक्‍यातील सहकारक्षेत्र दुर्दैवाने डबघाईस आलेले पाहावयास मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

SA vs IND: 23 Six, 17 Fours! जोहान्सबर्गच्या मैदानात सॅमसन-तिलकचं वादळ; भारताचं द. आफ्रिकेला तब्बल 284 धावांचं लक्ष्य

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

SCROLL FOR NEXT