The farmers son became a sub inspector Amravati news 
विदर्भ

Success Story : शेतकरीपुत्र झाला उपनिरीक्षक; पालवाडी येथील रोशन राऊतचे प्रयत्न फळाला

प्रशिक मकेश्वर

तिवसा (जि. अमरावती) : प्रगतीसाठी शिक्षण हाच एक मोठा पर्याय आहे. त्यासाठी परिस्थितीला न जुमानता अभ्यासाची कास धरून ध्येय गाठणे सहजशक्‍य होऊ शकते. याच जिद्द व चिकाटीने तिवसा तालुक्‍यातील पालवाडी या सातशे लोकवस्तीच्या लहानशा गावातील शेतकरी कुटुंबातील रोशन सुधाकर राऊत या तरुणाने आपले पीएसआय होण्याचे स्वप्न पूर्ण करून आई-वडिलांचे तसेच गावाचे नाव उंचावले.

रोशनने आपले प्राथमिक शिक्षण पालवाडी गावात पूर्ण केले. पुढील शिक्षण ग्रामीण विकास विद्यालय वाठोडा, तर बीएचे शिक्षण यादव देशमुख महाविद्यालय तिवसा येथून केले. तिवसा शहरातील शाहू महाराज वाचनालय याठिकाणी दहा, दहा तास अभ्यास करून रोशनने राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण केली. परीक्षेचा निकाल हाती येताच गावातील मंडळींनी कौतुकाची थाप दिली.

रोशनचे आई-वडील दोघेही निरक्षर. मुलाने सव्वीसाव्या वर्षात यशाचे शिखर गाठले. आई-वडील स्वतः जरी शिकले नसले तरी त्याच्या आई-वडिलांनी त्याला पोटाची खडगी भरून यासाठी हातभार लावला. आज आपला मुलगा मोठ्या पदावर जाऊन पोहोचला, याचा आनंद त्यांना असून गावातील इतरही मुलांनी आई-वडिलांचे नाव तसेच गावाचे नाव मोठे करावे, अशीच अपेक्षा रोशनच्या आई-वडिलांनी बोलून दाखविली.

पदवीचे शिक्षण पूर्ण करून अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रोशनने कुठलीही शिकवणी न लावता वाचनालयात अभ्यास केला आणि सातव्या प्रयत्नात त्याची पोलिस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली. नाशिक येथून पंधरा महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण करून येताच रोशनने आई-वडिलांचे आशीर्वाद घेतले.

मेहनतीच्या जोरावर यश

घरी अवघी दोन एकर जिरायत शेती व कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी पूर्णपणे शेतीवर तसेच आई-वडिलांच्या शेतमजुरीवर आहे. शेतात आई वडिलांना मदतही करून जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रमाच्या बळावर जीवनात यश मिळवायचेच, असा निर्धार रोशनने केला. त्याने सतत दोन वर्षे येथील श्री राजश्री शाहू महाराज वाचनालयात रोज १२ तास अभ्यास केला. राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला व त्याच्या घरी आनंदोत्सव साजरा झाला.

युवकांचा निर्धार

एका गावात मोठा पोलिस अधिकारी झाल्याने गावातील तरुणांच्या मनात आता जोश संचारला असून रोशनप्रमाणे आम्हीही पोलिस अधिकारी व मोठ्या शासकीय पदावर जाऊ, असा निर्धारच येथील युवकांनी केला आहे.

निर्णय व नियोजनबद्ध अभ्यास केला तर यश  प्राप्त होते
अभ्यासामध्ये सातत्य ठेवून सर्व तयारी करीत राहावी, कुठल्याही राज्यसेवेच्या जागा कमी किंवा जास्त त्यावर लक्ष न देता अभ्यास चालूच ठेवावा तसेच सर्व स्पर्धापरीक्षा देत राहाव्यात. निर्णय व नियोजनबद्ध अभ्यास केला तर यश नक्कीच प्राप्त होते. प्रत्येक दिवशी दोन ते तीन विषय अभ्यासाला घ्यावे.
- रोशन राऊत,
पीएसआय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT