Ladki Bahin Yojana esakal
विदर्भ

Ladki Bahin Yojana : पीडितांसाठी झटणाऱ्या बहिणी ‘लाडक्या’ नाहीत का?

Majhi Ladki Bahin Yojana Eligibility : बाल संरक्षण कक्षातील महिला कर्मचाऱ्यांची व्यथा; प्रसूती रजाही मिळेना

सकाळ वृत्तसेवा

- अविनाश साबापुरे

Yavatmal News : राज्य सरकारने ‘लाडकी बहीण’ योजना सुरू करून महाराष्ट्रातील बहुतांश महिलांसाठी दीड हजारांच्या मासिक मदतीचे दालन खुले केले आहे. परंतु, ही योजना राबविण्याची जबाबदारी असलेल्या महिला व बालविकास विभागातील महिला कर्मचारीच अनेक बाबतीत पीडित असल्याचे वास्तव समोर आले आहे. या खात्यात काम करणाऱ्या कंत्राटी महिलांना प्रसूती रजेचीही तरतूद नसल्याने आम्ही सरकारसाठी लाडक्या नाही का?, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

महाराष्ट्र राज्य बाल हक्क अधिकारी, कर्मचारी संघटनेच्या सचिव अ‍ॅड. सीमा भाकरे यांनी ही व्यथा पुढे आणली आहे. ‘लाडकी योजना’ राबविताना आम्हालाही सरकारने शासन सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

महिला बालविकास विभागाच्या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात बाल संरक्षण कक्ष कार्यान्वित केला आहे. या कक्षामार्फत पीडित महिला आणि बालकांसाठी विविध जोखमीच्या जबाबदाऱ्या पार पडल्या जातात.

परंतु, ‘मिशन वात्सल्य’ मध्ये गेल्या दहा वर्षांपासून राबणाऱ्या या कक्षातील महिला कर्मचाऱ्यांसाठी सरकारने कोणतेही धोरण निश्‍चित केलेले नाही. त्यांच्या कामाचा आकृतिबंधही निश्‍चित केला नाही. सर्वांत गंभीर म्हणजे, इतर विभागातील महिला कर्मचाऱ्यांना प्रसूती रजा मंजूर असताना महिला बालविकास खात्यात काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांसाठी मात्र प्रसूती रजेची तरतूदच करण्यात आलेली नाही. मानधन वाढही केलेली नाही.

या कामांची दखलच नाही

  • बालविवाह पीडित बालिकांना सांभाळणे. त्यांचे समुपदेशन करणे

  • लैंगिक अत्याचारांना बळी पडलेल्या बालकांना मार्गदर्शन करणे

  • कोरोना काळात ३० हजार एकपालक व नऊ हजार अनाथ बालकांचे समुपदेशन

  • कोरोना काळातील ८५० अनाथ बालकांच्या पुनर्वसनासाठी काम

  • देशभरातील ‘चाइल्ड हेल्पलाइन १०९८’ ची जबाबदारी पाहणे

निम्म्या मनुष्यबळावर काम?

बालविवाह रोखणे, बालकांवरील अत्याचार रोखणे अशी संवेदनशील कामे करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात बालसंरक्षण कक्ष निर्माण करण्यात आला आहे. प्रत्येक कक्षात १२ या प्रमाणात जवळपास पाचशे पदे मंजूर आहेत. प्रत्यक्षात महाराष्ट्रात केवळ २९८ कर्मचारी असू तेही कंत्राटावर आहेत. त्यामुळे निम्‍म्या मनुष्यबळावर ही जोखमीचे कामे कशी होणार, हा सवाल आहे.

बाल संरक्षण कक्षात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांच्या व्यथा आम्ही संघटनेच्या माध्यमातून २ जुलै रोजी मंत्रालयात मांडल्या. सरकारी सेवेत सामावून घेणे व सामाजिक सुरक्षा देणे या प्रमुख मागण्या आहेत. परंतु, सरकारकडून दखल घेतली गेली नाही. मग आम्ही लाडक्या बहिणी नाही का?’

- अ‍ॅड. सीमा भाकरे, सचिव, महाराष्ट्र राज्य बालहक्क अधिकारी, कर्मचारी संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT