fertilizers rate increases from march in yavatmal 
विदर्भ

आता रासायनिक खतांच्या किंमतीतही वाढ, शेतकरी वळले शेणखताकडे

चेतन देशमुख

यवतमाळ : इंधनाचे दर वाढल्याने शेतीच्या मशागतीच्या खर्चातदेखील वाढ झालेली आहे. त्यात आता रासायनिक खतांची भर पडली आहे. खत उत्पादक कंपन्यांनी गेल्या एक मार्चपासून खताच्या दरात वाढ सूचित केली आहे. त्यामुळे या दरवाढीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

रासायनिक खत उत्पादक कंपन्यांनी खतांच्या किंमतीत वाढ केली आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडण्याची शक्‍यता आहे. आधीच दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत आहेत. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी पूर्वतयारी सुरू केली आहे. त्यात इंधन दरवाढ झाल्याने शेतकऱ्यांच्या खर्चात आधीच वाढ झाली आहे. इंधन दरवाढीमुळे यंदा शेतकऱ्यांना गेल्या वर्षीच्या तुलनेत जादा दर द्यावे लागणार आहे. गेल्या वर्षीचा शेतकऱ्यांचा हंगाम फारसा चांगला गेला नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. भरघोस उत्पादन घेण्याच्या नादात शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर वाढविला आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली असली तरी जमिनीचा पोत मात्र, खालावला आहे. याचाच फायदा घेत कंपन्यांनी दरात या वर्षापासून वाढ केली आहे. वाढत्या दरामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. बॅगमागे 150 ते 250 रुपयांची वाढ झाली आहे. एक मार्चपासून खत उत्पादक कंपन्यांनी खताच्या दरात पन्नास किलोमागे वाढ केली आहे. इंधन पाठोपाठ आता खतांचे दर वाढल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. जुना साठा असेपर्यंत सध्या तरी जुनेच दर राहणार आहेत. दरवाढीला शेतकऱ्यांकडून विरोध होत आहे. त्यामुळे वाढत्या दराबाबत काय निर्णय होतो, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

रासायनिक खतांचे भाव -

खत जुने दर नवीन दर
डीएपी 1200 1450
20:20:0:13 950 1125
10:26:26 1185 1385
12:32:16 1200 1375
15:15:15 1040 1200
14:35:14 1257 1500
     


शेणखताची वाढली मागणी -
पूर्वी शेती मशागतीची कामे बैलांच्या साहाय्याने केली जात होती. यासोबतच शेतकरी दूध उत्पादनासाठी गाय, म्हशींचा सांभाळ करायचे. परिणामी प्रत्येक शेतकऱ्यांकडे पाच ते सहा जनावरे असायची. त्यामुळे शेतीसाठी मुबलक प्रमाणात शेणखतही उपलब्ध होत होते. सध्या टॅंकरची संख्या वाढली असून, जनावरांची संख्या कमी होत चालली आहे. रासायनिक खतांच्या किंमती वाढल्याने आता शेतकरी पुन्हा शेणखतांकडे वळले आहेत. त्यामुळे त्यांच्या दरातही वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT