नागभीड (जि. चंद्रपूर) : ब्रह्मपुरीच्या नगराध्यक्षांचे पती दीपक उराडे यांनी तालुक्यातील पारडी (ठवरे) येथील ग्रामपंचायत शिपायाला बेदम मारहाण केली. याप्रकरणी उराडे यांच्यावर नागभीड पोलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
सूरज सहदेव मेश्राम यांचे लग्न नागपूर जिल्ह्यात झाले. मेश्राम पारडी ( ठवरे) येथील रहिवासी असल्याने काही महिन्यापूर्वी त्यांनी ग्रामपंचायतमध्ये विवाह नोंदणी प्रमाणपत्रासाठी अर्ज केला. येथील ग्रामसेवक आणि शिपायाने कागदाची पूर्तता करण्यास सांगितले. त्यांनी ते दिले नाही. त्यामुळे त्यांना विवाह नोंदणी प्रमाणपत्र दिले नाही. दरम्यान शिपाई भारत ठाकरे आणि सूरजची भेट झाली. कागदपत्रांची पूर्तता करा आणि नोंदणी प्रमाणपत्र घेऊन जा, असे त्यांनी सांगितले. तेव्हा सुरजने ब्रह्मपुरीच्या नगराध्यक्ष नीता उराडे यांना भ्रमणध्वनी केला. शिपायाने कागदांची पूर्तता केल्याशिवाय प्रमाणपत्र मिळणार नाही, असे नगराध्यक्षांना सांगितले. तेव्हा नगराध्यक्ष यांचे पती दीपक उराडे यांनी कागदपत्रांशिवाय प्रमाणपत्र दे, असे सांगितले. परंतु ठाकरे यांनी तसे करता येणार नाही, असे स्पष्ट केले. तेव्हा दीपक उराडे यांनी गावात येतो, अशी धमकी त्याला दिली. कोरोना संदर्भात ग्रामपंचायतमध्ये बैठक आयोजित केली होती. या बैठकीत सरपंच, ग्रामसेवक, पोलिस पाटील, उपसरपंच ,आशा वर्कर, अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. तेवढ्यात दीपक उराडे तिथे गाडी घेऊन आले. तेव्हाच शिपाई भरत ठाकरे हा तिथे पोहोचला. आल्याबरोबर उराडे यांनी शिपायाला अश्लील शिवीगाळ करीत मारहाण करण्यास सुरुवात केली. तेथील सरपंच, ग्रामसेवक व उपस्थित असणाऱ्यांनी समजविण्याचा प्रयत्न केला .परंतु उराडे यांनी कुणाचेही न ऐकता मारहाण केली आणि तिथून निघून गेले. यानंतर शिपायांनी थेट पोलिस ठाणे गाठून दीपक उराडे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी भादंवी 186, 188, 294,504, 506 अन्वये गुन्हा दाखल केला.
सविस्तर वाचा - त्या पाच भावंडांना अखेर मिळाला मायेचा आधार
बेदम मारहाण
शिपाई आल्याबरोबर दीपक उराडे आणि त्याचा भाचा यांनी शिपायाला बेदम मारहाण करण्यास सुरवात केली. आम्ही सोडविण्याचा प्रयत्न केला. परंतु आमचे ऐकले नाही.
मंगला ब्राम्हणकर
सरपंच, पारडी ठवरे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.