Five children seriously injured in lightning strike Incidents in Digras taluka of Yavatmal district 
विदर्भ

वीज पडून पाच बालक गंभीर जखमी; यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्‍यातील घटना

सकाळ वृत्तसेवा

दिग्रस (जि. यवतमाळ) : अवकाळी पावसादरम्यान शहरासह दत्तापूर येथील शेतशिवारातील बाभळीच्या झाडावर वीज कोसळल्याने पाच बालके गंभीर जखमी झाली. तर शहरातील कृष्णा पार्कमधील एका घरावर वीज पडल्याने दोन पक्ष्यांचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (ता. २३) सकाळी पावणेदहाच्या सुमारास घडली. राम भट (वय १७), आहू शेळके (वय १२), संतोष शेळके (वय २०), वंशिका साळवे (वय ११) व मंगेश टाले (वय १५, सर्व रा. दत्तापूर) अशी जखमी बालकांची नावे आहेत. यातील मंगेश टालेला गंभीर दुखापत झाल्याने यवतमाळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. उर्वरित चौघांवर दिग्रस येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दत्तापूर येथील सहा बालके घरच्या शेळ्या चारण्यासाठी शहरालगत असलेल्या श्री भवानी माता मंदिरामागील परिसरात गेले होते. त्यानंतर अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. बालकांनी पावसापासून बचाव करण्यासाठी बाभळीच्या झाडाचा आसरा घेतला. तेव्हा अचानक वीज कोसळल्याने झाडाखाली असलेल्या सहा बालकांपैकी पाच जण जखमी झाले. त्यांच्या अंगावर वीज पडल्याने ते घटनास्थळी बेशुद्धावस्थेत पडून होते. त्या ठिकाणी उपस्थितांपैकी एक असलेली अंजली साळवे ही आरडाओरडा करीत गावात गेली.

माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी तत्काळ जखमी बालकांना दिग्रस ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. विजेमुळे बालकांच्या अंगावरील कपडे जळाले होते. तर बालकांच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या आहेत. पाच बालकांमधील मंगेश टाले याला दिग्रस ग्रामीण रुग्णालयातून तत्काळ यवतमाळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. दिग्रसचे तहसीलदार राजेश वझीरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला माहिती दिली. दिग्रस शहरातील मध्यवस्तीत असलेल्या कृष्णा पार्कमधील डॉ. अरविंद छत्ताणी यांच्या घरावर वीज पडली.

सुरक्षित ठिकाणी आसरा घ्या

अवकाळी पावसाने सध्या दिग्रस शहरासह तालुक्‍यात थैमान घातले आहे. पावसासह विजेचा कडकडाटात पाऊस सुरू आहे. नागरिकांनी विजेपासून बचावासाठी झाडाचा आसरा न घेता सुरक्षित ठिकाणी राहावे, असे आवाहन तहसीलदार राजेश वझीरे यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT