flood situation in Gadchiroli three days rain update Traffic on 30 routes was closed Sakal
विदर्भ

Gadchiroli Rain News : गडचिरोली जिल्ह्यात अभूतपूर्व पूरस्थिती; तीन दिवसांपासून संततधार; ३० मार्गांवरची वाहतूक झाली बंद

सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली : जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून संततधार पाऊस येत असून अभूतपूर्व पूरपरीस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तब्बल ३० मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच अनेक गावांचा संपर्कही तुटला आहे.

पुरामुळे आलापल्ली –भामरागड राष्ट्रीय महामार्ग (कुडकेली नाला), (चंद्रा नाला) ता. भामरागड, अहेरी-मोयाबिनपेठा रस्ता वट्रा नाला ता. अहेरी, आलापल्ली ते सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग (गोलाकर्जी ते रेपनपल्ली-रोमनपल्ली भाग) ता. अहेरी,

जारावंडी ते राज्यसीमा भाग ता.धानोरा, पोर्ला-वडधा रस्ता ता. कुरखेडा, वैरागड-जोगीसाखरा-शंकरपुर- चोप कोरेगाव रस्ता ता. वडसा, कुरखेडा-वैरागड ता. कुरखेडा, कारवाफा-पोटेगाव रस्ता, गोठनगाव-सोनसूरी रस्ता ता. कुरखेडा,

वडसा-नवरगाव-आंधळी-चिखली रस्ता ता. देसाईगंज, लखमापूर-बोरी-गणपुर-हळदीमाल नाला,आलापल्ली –भामरागड राष्ट्रीय महामार्ग (पर्लकोटा नदी), भेंडाळा-अनखोडा रस्ता ता. चामोर्शी, मुल-हरणघाट रस्ता दहेगाव नाला ता. चामोर्शी, चांदेश्वर टोला रस्ता ता. चामोर्शी, फोर्कुडी-मार्कंडादेव रस्ता ता. चामोर्शी,

वडसा-नैनपुर-विठ्ठलगाव रस्ता ता. कुरखेडा, चिखली-धमदीटोला रस्ता ता. कुरखेडा, गोठनगाव चांदगाव रस्ता ता. आरमोरी, आरमोरी-रामाळा रस्ता ता. आरमोरी, वैरागड-कढोली रस्ता ता. आरमोरी, पेंढरी-ढोरगट्टा रस्ता बांडिया नदी ता. धानोरा, भाडभिडी-रेगडी-देवदा रस्ता ता. चामोर्शी,

कोनसरी-जामगड रस्ता ता. चामोर्शी, सारखेडा-भापडा रस्ता ता. धानोरा, चामोर्शी-फराळा मार्कंडादेव रस्ता, आरमोरी-शंकरपुर रस्ता, ठाणेगाव- वैरागड रस्ता,) गडचिरोली-आरमोरी राष्ट्रीय महामार्ग, गडचिरोली-चामोर्शी राष्ट्रीय महामार्ग,

असे एकूण ३० रस्ते बंद झाले आहेत. गोदावरी, प्राणहिता, पर्लकोटा, वैनगंगा, खोब्रागडी, कठाणी, सती नदी, वैलोचना अशा अनेक नद्यांना पूर आला असून कित्येक गावांचा संपर्क तुटला आहे. पावसाची संततधार अशीच सुरू राहिल्यास परीस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शहरी भागांनाही फटका

जिल्ह्यात संततधार पावसामुळे पूरपरीस्थिती निर्माण होऊन ग्रामीण भागातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. याशिवाय या पुराचा फटका शहरी भागांनाही बसला आहे. गडचिरोली शहरातील अनेक नववसाहतींमध्ये पाण्यामुळे पूरपरीस्थिती निर्माण झाली आहे.

गडचिरोली शहराचा विस्तार वाढत असताना अनेक ठिकाणी नवी घरे निर्माण होऊन नव्या वसाहती तयार झाल्या. पण येथे रस्ते, पाण्याचा निचरा होण्यासाठीची व्यवस्था अशा अनेक सुविधांचा अभाव असल्यामुळे येथील नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. याशिवाय शहरातील मुख्य भागात असलेल्या नगर परीषदेच्या इमारतीतसुद्धा चहुबाजुने पाणी झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT