सिंदी (रेल्वे) ( जि.वर्धा ) : शहरात सर्वत्र मोकाट फिरणाऱ्या जनावरांनी चांगलाच उच्छाद मांडला आहे. यांच्यामुळे सिंदीकरांना दररोज नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पालिकेच्या या मोकाट जनावरांना आवरणे अवघड झाले आहे. यामुळे मोकाट जनावरांना आवरा, अशी म्हणणाऱ्यांची वेळ सिंदीवासियांवर आली आहे.
हेही वाचा - महापौर संदीप जोशींना कोरोनाची लागण, संपर्कात...
सविस्तर वृत्त असे की, शहरात मोकाट जनावरांची संख्या वाढली आहे. अनेक गोपालक दररोज दूध तर काढतात, मात्र दिवसभर आपली ही जनावरे शहरात मोकाट सोडून देतात. ही जनावरे दिवसभर शहरातील खुल्या घरात घुसून नासधूस करतात. ऐवढेच नाही तर शहरालगतच्या शेतात शिरून शेत पिकाची नासाडी करतात. या मोकाट जनावरांच्या त्रासामुळे शेतकरी वैतागले आहेत. याशिवाय ही जनावरे शहरातील प्रमुख रहदारीच्या रस्त्यावर मधोमध ठिय्या मांडून बसतात. परिणामी वाहन घेऊन शहरात येणाऱ्या जाणाऱ्यांना दररोज अडचणीचा सामना करावा लागतो.
हेही वाचा - राणे दाम्पत्य आत्महत्या प्रकरणाचे गूढ उकलले :...
शेतीव्यवसाय करणाऱ्यांचे हे शहर आहे. यामुळे येथे जनावरांची संख्या अधिक आहे. यामुळे शहरात गाई, म्हशी, बकऱ्या आणि बैल वासरांची संख्या मोठी आहे. यातील काही गुरे पाळणाऱ्यांनी नवीनच प्रकार सुरू केला. रात्री आपल्या गोठ्यात घरी बांधलेली जनावरे सकाळी दूध काढले की शहरात हाकलून देतात. रात्री पुन्हा घरी आणून बांधतात, अशा जनावरांची संख्या वाढली आहे.
इंग्रजकालीन कोंडवाडा केला नाहीसा -
शहरात इंग्रज काळापासून 'कांजी हाऊस' (कोंडवाडा) होता. तेव्हा अशा त्रास देणाऱ्या मोकाट जनावरांना पकडून कोंडवाड्यात डांबले जायचे. ही जनावरे सोडविण्यासाठी जनावरांच्या मालकाला आर्थिक दंड पडायचा. यामुळे जनावर मालक आपली जनावरे पुन्हा नासधूस किंवा त्रास देणार नाही याची काळजी घ्यायचा. मात्र, पालिकेने हा कोंडवाडा नाहीसा केल्याने अडचण निर्माण झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.