The funeral took place six days after the rumor of Corona in Yavatmal 
विदर्भ

एका चुकीमुळे नातेवाईकांना सहा दिवस कराव लागली अंत्यसंस्कारासाठी प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा

पांढरकवडा (जि. यवतमाळ) : नाव धर्मा कुरवते... राहणार अंभोरा... व्यसन दारूचे... त्याने अवैधरीत्या गाळलेली दारू प्राशन केली... प्रकृती खराब झाल्याने पांढरकवडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले... मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने यवतमाळ येथील वैद्यकीय महाविद्यालयात रेफर केले... येथील डॉक्‍टरांनी थेट कोरोनाचे सॅम्पल घेण्याचे आदेश दिले... एकाच दिवसात धर्माचा मृत्यू झाला... कोरोनाचा अहवाल आल्याशिवाय मृतदेह कुटुंबाला देणार नसल्याचे कुटुंबाला प्रशासनाने कळवले... अन्‌ मग सुरू झाला अंत्यसंस्कारापर्यंतचा प्रवास... 

कोरोना विषाणूमुळे प्रत्येकच माणूस भयभीत झाला आहे. लॉकडाउनमुळे जनजीवन ढवळून निघाले आहे. सध्याच्या परिस्थितीत कशानेही मृत्यू झाला तरी मनात शंकेची पाल चुकचुकते. यातून दु:खात असलेल्या नातेवाईकांना अनेक यातना सहन कराव्या लागत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील अंभोरा येथील रहिवासी धर्मा याने झंझारपूर येथे अवैधरीत्या गाळण्यात आलेली दारू जास्त प्रमाणात प्राशन केली. यानंतर त्याची प्रकृती बिघडल्याने पांढरकवडा येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला यवतमाळ येथील वैद्यकीय महाविद्यालयात रेफर करण्यात आले.

मात्र, येथील डॉक्‍टरांनी त्याचा मद्यप्राशनाचा इतिहास न विचारता थेट कोरोनाचे सॅंम्पल घेण्याचे आदेश दिले. तसेच रिपोर्ट येईपर्यंत विलगीकरण कक्षात ठेवण्यास सांगितले. मात्र, धर्माचा एकाच दिवसात उपचाराविना मृत्यू झाला. धर्माचा कोरोनाचा रिपोर्ट आल्याशिवाय मृतदेह कुटुंबाला देता येणार नाही, असे वडिलांना प्रशासनाने सांगितले. 

मात्र, मुलाचा मृतदेह आणण्यासाठी दोनवेळा वडील पंधराशे रुपयांचा ऑटो करून गेले. मृतदेह आपल्याकडे सोपविण्यात यावा, अशी मागणी केली. मात्र, प्रशासन आपल्या निर्णयावर ठाम राहिले. दुसरीकडे विलगीकरण कक्षात धर्माने अखेरचा श्‍वास घेतला. त्यामुळे मृतदेह ताडउमरी येथे आणू द्यायचा नाही, असा निर्णय सरपंच, पोलिस पाटील आणि गावकऱ्यांनी घेतला. यामुळे धर्माच्या वडिलांनीही मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. सरकारनेच काय ते करावे, असे तहसीलदारांना लेखी लिहून दिले होते. 

ग्रामस्थांची आरोग्य तपासणी

धर्माचा मृत्यू अतिमद्यप्राशनाने झाला. मात्र, त्याला कोरोना झाला होता, अशी अफवा गावात पसरली. यामुळे धर्मा कुणाकुणाच्या संपर्कात आला याची चौकशी करण्यात आली. झुंझारपूर व ताडउमरी येथील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

मले कोरोना नव्हता झाला...

मृत धर्माचा मृतदेह वैद्यकीय महाविद्यालयात सहा दिवसांपासून शवविच्छेदन गृहात ठेवून होता. सुरुवातीला प्रशासनाने मृतदेह देण्यास टाळाटाळ केली. नंतर प्रशासनाकडून अंत्यसंस्काराला हिरवा कंदील दाखविण्यात आला. यानंतर गावातही अंत्यसंस्कार करण्यास विरोध करण्यात आला. "मले कोरोना झाला नव्हता, माझा अंतिम संस्कार करा', असा टाहो तर धर्मा फोडत नसेल ना, असा प्रश्‍न यानिमित्त उपस्थित होते. 

दारूने घेतला जीव

यवतमाळ जिल्हा रेड झोनमध्ये असल्याने ग्रामीण व शहरी जनतेत भीतीचे वातावरण आहे. केळापूर तालुका देखील त्याला अपवाद नाही. देशी व विदेशी दारूची दुकाने बंद आहेत. दारूच प्यायला मिळत नसल्याने अनेक तळीराम गावठी दारूकडे वळले आहेत. अशातच तालुक्‍यातील ताडउमरी येथील जावई असणारा मुळचा अंभोरा येथील रहिवासी धर्मा कुरवते याचा गावठी दारूने मृत्यू झाला. त्याला कोरोनो झाल्याची अफवा पसरल्याने अंत्यसंस्काराचा पेच निर्माण झाला.

असा पार पडला अंत्यसंस्कार

प्रशासनाकडून अंत्यसंस्काराला हिरवा कंदील मिळाल्यानंतर वडिलांनी मृतदेह स्वीकारला. मात्र, गावकऱ्यांनी मृतदेहावर गावात अंत्यसंस्कार करण्यास मनाई केली. यामुळे नातेवाईकांनी अंत्यसंस्कारासाठी यवतमाळ गाठले. पत्नी, साळा, वडील यांच्या उपस्थितीत सोमवारी दुपारी यवतमाळ येथे धर्मावर अंत्यसंस्कार करण्यात आला, अशी माहिती साळा विठोबा पेंदोर यांनी दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT