Maoist Ganesh Punem sakal
विदर्भ

Maoist Surrender : जहाल माओवाद्याने सीआरपीएफसमोर केले आत्मसमर्पण

सरकारने सहा लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केलेल्या जहाल माओवाद्याने केले आत्मसमर्पण

सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली - सरकारने सहा लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केलेला जहाल माओवादी गणेश गट्टा पुनेम (वय ३५) रा. बेच्चापाल, ता. भैरमगड, जि. बिजापूर (छत्तीसगड) याने मंगळवार (ता. २८) सीआरपीएफचे पोलिस उप-महानिरीक्षक जगदीश मीणा यांच्या समोर आत्मसमर्पण केले. त्यानंतर त्यांनी त्याचे हस्तांतरण गडचिरोली पोलिस दलाकडे केले.

आत्मसमर्पीत जहाल माओवादी गणेश गट्टा पुनेम २०१७ मध्ये सप्लाय टिम (भैरमगड एरीया) दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन जानेवारी २०१८ पर्यंत कार्यरत होता. २०१८ मध्ये सप्लाय टिममध्ये उप-कमांडर पदावर त्याची बढती झाली. २०१८ पासून आतापर्यंत सप्लाय टिम उप-कमांडर (भैरमगड एरिया) पदावर कार्यरत होता.

२०१७ मध्ये मौजा मिरतूर, जि. बिजापूर (छत्तीसगड) जंगल परिसरात व २०२२ मध्ये मौजा तिम्मेनार जि. बिजापूर (छत्तीसगड) जंगल परिसरात झालेल्या चकमकींमध्ये त्याचा सहभाग होता. महाराष्ट्र शासनाने गणेश गट्टा पुनेम याच्यावर ६ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरिता केंद्र व राज्य शासनाकडून गणेश गट्टा पुनेम याला एकूण ५ लाख रुपये बक्षीस जाहीर केले आहे.

माओवाद्याचे आत्मसमर्पण घडवून मुख्य प्रवाहात आणण्याबाबतची कारवाई सी.आर.पी.एफ. चे पोलिस उप-महानिरीक्षक (अभियान) जगदीश मीणा व गडचिरोली जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनात उप-कमांडण्ट सीआरपीएफ नितीन कुमार यांच्या नेतृत्वात आर.एफ.टी (रेंज फिल्ड टीम) च्या इंटर सेल पथकाकडून करण्यात आली.

आतापर्यंत ६६२ माओवादी शरण

गडचिरोली पोलिस दलाने अतिशय प्रभावीपणे माओवादविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने माओवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने सन्मानाने जीवन जगण्यासाठी २०२२ ते २०२४ मध्ये या दोन वर्षांत एकूण १४ जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. तर त्याच्या आधीपासून आतापर्यंत एकूण ६६२ माओवाद्यांनी गडचिरोली पोलिस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे.

विकासकामांना आडकाठी निर्माण करणा­ऱ्या माओवाद्यांवर पोलिस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असून जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास इच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलिस दल सर्वतोपरी मदत करेल. त्यांनी हिंसेचा त्याग करून शांततेचा मार्ग स्वीकारावा.

- नीलोत्पल, पोलिस अधीक्षक, गडचिरोली

ही आहेत आत्मसमर्पित होण्याची कारणे

  • माओवादी दलममध्ये अहोरात्र भटकंतीचे जीवन असून, स्वत:च्या आरोग्याविषयी समस्या उद्भवल्यास त्याकडे काळजीपूर्वक लक्ष दिले जात नाही.

  • दलममधील वरिष्ठ कॅडरचे माओवादी सांगतात की, चळवळीकरीता/जनतेकरिता पैसे गोळा करावे लागतात. प्रत्यक्षात गोळा केलेला पैसा ते स्वत:साठीच वापरतात. जनतेच्या विकासासाठी कधीच वापरले जात नाही.

  • वरिष्ठ माओवादी नेते फक्त स्वत:च्या फायद्यासाठी गरीब आदिवासी युवक-युवतींचा वापर करून घेतात.

  • दलममध्ये असताना विवाह झाला तरीही वैवाहिक स्वतंत्र आयुष्य जगता येत नाही.

  • गडचिरोली पोलिस दलाच्या आक्रमक माओवादविरोधी अभियानामुळे माओवादी कारवायांचे कंबरडे मोडले आहे.

  • वरिष्ठ माओवादी नेते पोलिस खबरी असल्याच्या संशयावरून आमच्याच निष्पाप बांधवांना ठार मारायला सांगतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

IND vs AUS : ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी रचला इतिहास; एकत्रित ५०० विकेट्स घेणारे जगातले पहिलं गोलंदाजी युनीट

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

SCROLL FOR NEXT