Police Bharti News Updates Sakal
विदर्भ

Police Recruitment : भरतीत अनेकांची बनवाबनवी! प्रकल्पग्रस्तांसह 'क्रीडा'चे सुद्धा बनावट प्रमाणपत्र

सकाळ डिजिटल टीम

गडचिरोली : नुकत्याच झालेल्या पोलिस भरतीत काही उमेदवारांनी प्रकल्पग्रस्तांचे बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचे प्रकरण ताजेच असताना आता काहींनी बनावट क्रीडा प्रमाणपत्रेही सादर केल्याचे उघडकीस आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाच्या खोलात जाण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला आहे.

गडचिरोली पोलिस भरती दरम्यान काहींनी प्रकल्पग्रस्तांचे खोटे प्रमाणपत्र सादर केले होते. या प्रकरणी अद्याप आरोपपत्र दाखल होणे बाकी असतानाच क्रीडा आरक्षणाच्या कोट्यातील उमेदवारांनीदेखील बनावट प्रमाणपत्राच्या माध्यमातून लाभ घेतल्याचे प्रकरण बाहेर आले आहे. गडचिरोली जिल्हा पोलिस दलात चार महिन्यांपूर्वीच भरती प्रक्रिया राबविण्यात आली.

एकूण 348 जागांसाठीच्या या भरतीत काही उमेदवारांनी प्रकल्पग्रस्तांच्या आरक्षण कटातून नियुक्ती मिळवली होती. मात्र, या उमेदवारांचे प्रमाणपत्र बनावट निघाले होते. या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान पोलिसांना क्रीडा विभागाच्या आरक्षण कोट्यातही बनावट प्रमाणपत्र जोडून काही उमेदवारांनी अवैधपणे नोकरीचा लाभ घेतल्याची माहिती मिळाली.

त्या आधारावर जिल्हा पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनात या विषयाचा छडा लावण्याचे काम स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू करण्यात आले. प्रकल्पग्रस्तांचे बनावट प्रमाणपत्र देत नोकरीचा लाभ घेतल्याच्या आरोपावरून दोन नवनियुक्त पोलिसांतील एकाला अटक झाली होती. त्यानंतर राज्यात ठिकठिकाणी बनावट प्रमाणपत्र सादर करून भरती झालेल्या उमेदवारांचे तसेच हे प्रमाणपत्र मिळवून देणान्या रॅकेटमधील लोकांचे अटकसत्र राबविले गेले.

या प्रकरणातील आरोपी अद्याप तुरूंगात आहेत. आता बनावट प्रमाणपत्र देऊन पोलिस दलात भरती झालेले उमेदवारदेखील पोलिसांच्या हाती आले आहेत. नागपूर येथील एका शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे बनावट प्रमाणपत्र जोडलेल्या सात जागांची चौकशी अंतिम टप्प्यात आली असून गडचिरोलीतील एक पत्रकार व एका क्रिडा प्रशिक्षकाच्या माध्यमातून दोघांनी बनावट क्रीडा प्रमाणपत्र देऊन खेळाडू कोट्यातून भरतीचा लाभ घेतल्याच्या शंकेवरून गुन्हे शाखेत चौकशी सुरू आहे.

याप्रकरणात बनावट प्रमाणपत्र दिलेले लाभार्थी व असे प्रमाणपत्र बनवून देणान्याची संख्या वाढण्याची शक्यता आहे. जिल्हा पोलिस दलातच चार महिन्यांपूर्वीच भरतीप्रक्रिया राबविण्यात आली. एकूण 348 जागांसाठीच्या या भरतीत काही उमेदवारांनी प्रकल्पग्रस्तांच्या कोट्यातून नियुक्ती मिळविली होती. मात्र, हे उमेदवार व त्यांचे कुटुंबीय वर्षानुवर्षे गडचिरोलीचे रहिवासी असताना प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र मात्र बीड येथील असल्याने ते नियमबाह्य असल्याचा दावा एका निनावी पत्राद्वारे केला होता.

पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांना हे निनावी पत्र प्राप्त झाले होते. या पत्राच्या आधारे चौकशी पोलिसांनी चौकशी केली. बनावट प्रमाणपत्र देत नोकरीचा लाभ घेतल्याच्या आरोपावरून दोन नवप्रविष्ट पोलिसांसह नियुक्तीच्या प्रतीक्षेतील एकास अटक झाली होती. त्यानंतर राज्यात ठिकठिकाणी बनावट प्रमाणपत्र सादर करून भरती झालेल्या उमेदवारांचे तसेच हे प्रमाणपत्र मिळवून देणाऱ्या रॅकेटमधील लोकांचे अटकसत्र राबविले होते.

दरम्यान, जिल्हा पोलिस दलात खेळाडूंसाठी 5 टक्के जागा आरक्षित आहेत. याद्वारे जवळपास 15 जणांची निवड झालेली आहे. ते सध्या खात्यात रुजू असून, प्रशिक्षण सुरू आहे. मात्र, भरती होताना सादर केलेल्या खेळाच्या प्रमाणपत्रावरून शंका निर्माण झाल्याने या आरक्षणाचा लाभ घेतलेले सर्वच उमेदवारांच्या दस्ताऐवजांची पडताळणी सुरु असल्याची माहिती मिळाली आहे.

उमेदवारदेखील चौकशीच्या रडारवर आले आहेत. खेळाचे बनावट प्रमाणपत्र देऊन त्यांनी खेळाडू कोट्यातून भरतीचा लाभ घेतल्याची शंका आहे. त्यानुषंगाने गुन्हे शाखेमार्फत चौकशी सुरू आहे. याबाबत पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांना संपर्क केला असता त्यांनी यास दुजोरा दिला. चौकशी पूर्ण झाल्यावर यातील तथ्य समोर येईल, असे त्यांनी सांगितले.

15 जणांची पडताळणी सुरू...

गडचिरोली येथील पोलिस भरतीत काही उमेदवारांनी प्रकल्पग्रस्तांचे बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचे निष्पन्न झाले होते. याचे राज्यभर मोठे रॅकेट उघडकीस आल्यानंतर आता खेळाचेही बनावट प्रमाणपत्र देऊन लाभ घेतल्याची माहिती उघडकीस आली आहे. त्या अनुषंगाने गुन्हे शाखेकडून नवप्रविष्ट 15 पोलिसांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी सुरू करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : कमला हॅरिस की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प? महासत्तेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेत मतदान

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT