The girl tried to kill her father at Bhandara 
विदर्भ

‘तू प्रेमविवाह केला ना, मग पतीला का सोडले?' वडिलांनी हा प्रश्न विचारताच मुलगी चिडली अन्...

शैलेश उरकुडे

लाखनी (जि. भंडारा) : ‘तू प्रेमविवाह केला ना, मग पतीला का सोडले? तुझ्या वागणुकीत सुधारणा कर' असे म्हणत वडिलांनी विवाहित मुलीला रागावले. वडिलांचे हे बोलणे मुलीला असह्य झाले. तिने मनात राग धरून ठेवला. रात्री वडिलांच्या अंगावर गरम तेल टाकून ठार मारण्याचा प्रयत्न केला. मनोज महादेव रामटेके (वय ४७) असे जखमी वडिलांचे नाव आहे. ही घटना तालुक्‍यातील चिचगाव येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लाखनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चिचगाव येथील मनोज रामटेके याच्या २५ वर्षीय मुलीने तीन वर्षांपूर्वी जवळच्या गावातील युवकासोबत प्रेमविवाह केला होता. तेव्हापासून ती पतीसोबत राहत होती. परंतु, घरगुती कारणावरून दोघांमध्ये वादविवाद व्हायला सुरुवात झाली. त्यामुळे एक वर्षापासून ती माहेरी राहत होती.

शुक्रवारी तिचे वडिलांसोबत भांडण झाले. संतापलेल्या वडिलांनी मुलीला प्रेमविवाह केल्यानंतर पतीला कां सोडले? तुझ्या वागणुकीत सुधारणा कर असे म्हटले. याबाबत मुलीने आपल्या मनात राग धरून ठेवला. रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास तिने वडील मनोज रामटेके यांना ठार मारण्याच्या उद्देशाने अंगावर कढईतील उकळते तेल टाकले. यामुळे त्याचे डोके, चेहरा, मान, छातीचा भाग, पाठ व दोन्ही खांदे गंभीर भाजले. यानंतर मुलगी घरून पळून गेली.

वडील ४० टक्के भाजले

गंभीर जखमी झालेले मनोज रामटेके तडफडत असल्याने मुलगा व पत्नी यांनी रुग्णवाहिकेद्वारे त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. सध्या जखमी मनोज रामटेके भंडारा येथील सामान्य रुग्णालयात वॉर्ड क्रमांक १९मध्ये उपचार घेत आहे. या घटनेत तो ४० टक्के भाजल्याची माहिती डॉक्‍टरांनी दिली आहे.

क्रूर मुलगी फसार

भंडारा पोलिसांनी रुग्णालयातील वैद्यकीय अहवालावरून या घटनेची नोंद करून तपासासाठी प्रकरण लाखनी पोलिसांकडे पाठवले आहे. जन्मादात्याच्या अंगावर उकळते तेल ओतणारी क्रूर मुलगी घटनेच्या दिवसापासून पसार आहे. पोलिस निरीक्षक दामदेव मंडलवार यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक रवींद्र म्हैसकर, पोलिस शिपाई मुकेश गायधने तिचा शोध घेत आहेत.

अतिरेकी कृत्यातून काय साध्य होईल?

सध्या शिक्षण व रोजगाराच्या साधनांवर कोरोना संकटाचा प्रभाव असून, अनेकांना घरीच बसून राहावे लागत आहे. भंडारा शहरातील एका मुलाला पब्जी गेम खेळण्यास वडील रागावले म्हणून गेल्या महिन्यात गळफास लावून आत्महत्या केली होती. आता लाखनी तालुक्‍यात विवाहिता मुलीने जन्मदात्याच्या अंगावर उकळते तेल टाकून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. अशा अतिरेकी कृत्यातून काय साध्य होईल, असा प्रश्‍न आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajesh Kshirsagar Won Kolhapur North Assembly Election : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: आदित्य ठाकरेंनी लाज राखली ;वरळीचा गड राखला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: बेलापूरमध्ये भाजपच्या मंदा म्हात्रे विजयी

Jaykumar Gore won Man Assembly Election 2024 Result: जयाभाऊचा विजयाचा चाैकार! माण-खटावमध्ये प्रभाकर घार्गे यांचा माेठा पराभव

SCROLL FOR NEXT