झडशी (जि. वर्धा) : लगतच्या गिरोली (टेकडी) परिसरातून दिवसरात्र मुरमाचे उत्खनन करून भरधाव जाणाऱ्या टिप्परमुळे येथील नागरिकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. समृद्धी महामार्गाच्या बांधकामासाठी मुरूम, बोल्डर नेण्याचे काम ही वाहने करीत आहेत. मात्र या वाहनाने हिवरा येथील अर्जुन सोळंकी यांच्या बकरीला धडक दिली.
त्यामुळे संतापलेल्या सोळंकी यांनी या रस्त्यावरून जाणारी सर्वच टिप्पर अडवून आपला रोष व्यक्त केला. आर्थिक नुकसान भरपाईचीही मागणी केली.
३० नोव्हेंबर रोजी नेहमीप्रमाणे हिवरा येथील अर्जुन सोळंकी हा आपल्या बकऱ्या चारून सायंकाळी घरी जात होता. परंतु, मागाहून एका मागे एक दहा ते बारा टिप्पर येळाकेळी-गिरोली मार्गाने भरधाव येत होते. येणाऱ्या टिप्परने त्यांच्या एका बकीरीला धडक दिली. यात बकरी गंभीर जखमी झाली. हे पाहता सोळंकी यांनी संपूर्ण वाहने रस्त्याच्या कडेला रोखून धरली. माझे आर्थिक नुकसान झाले असून अगोदर नुकसान भरपाई द्या; तरच वाहने जाऊ दिले जाईल, अशी भूमिका सोळंकी यांनी घेतली होती.
जाणून घ्या : सोयाबीन, कापसापाठोपाठ तुरही धोक्यात; शेंगा पोखरणाऱ्या अळीचा हल्ला
याची माहिती सेलू पोलिसांना मिळताच त्यांनीही घटनास्थळ गाठले. यावेळी उलट बकरी चारणारा सोळंकी यांनाच धमकावू लागले. हे पाहून काहींनी मध्यस्थी करून हा वाद सोडविला. सोळंकी यांना समृद्धीच्या कंत्राटदारांच्या कर्मचाऱ्यांकडून नुकसान भरपाई देण्यात आली. परंतु, पोलिस प्रशासनाच्या बेजबाबदार कार्यप्रणालीमुळे मुरूम वाहून नेणाऱ्या टिप्परने जीव घेतल्याशिवाय थांबणार नाही काय, असा प्रश्न यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.
गिरोली परिसरातून मुरूम घेऊन जाणाऱ्या या वाहनांची गती भरधाव असते. या भरधाव गतीमुळे येथे मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे या वाहनांच्या गतीवर नियंत्रण घालण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. शिवाय पोलिसांकडूनही या वाहनांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
(संपादन : दुलिराम रहांगडाले)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.