Goat sheep professionals modern technology knowledge 
विदर्भ

सामंजस्य करारातून मेंढपाळांची उन्नती

शेळी-मेंढीपालक व्यावसायिकांना मिळणार आधुनिक तंत्रज्ञानाची परिपूर्ण माहिती

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : सामान्यपणे पारंपरिक पद्धतीने शेळी- मेंढी पालनाचा व्यवसाय आजवर सुरू आहे. मात्र आधुनिक संशोधनाची माहिती अद्यापही मेंढपाळ बांधवापर्यंत पोहोचलेली नसल्याने पशुमृत्यूचे प्रमाण अधिक तर त्या तुलनेने कमी नफा अशी परिस्थिती आहे. या परिस्थितीत सुधारणा घडवून आणण्यासाठी मेंढपाळ धनगर विकास मंचने पुढाकार घेतला असून केंद्रीय मेंढी व लोकर संशोधन संस्थेसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे.

हा करार करण्यात मेंढपाळ धनगर विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष संतोष महात्मे यांनी पुढाकार घेतला आहे. भारत सरकारच्या या अग्रणी संस्थेकडून मेंढी व शेळी उत्पादनाच्या सर्व पैलूंवर संशोधन करण्यात येते. मेंढी व शेळीच्या नवनवीन जाती तसेच ब्रीड संशोधित केल्या जाते. त्यांना लागणारा सकस आहार, शास्त्रसुद्धा निवारा, आरोग्यविषयक बाबी यावर अभ्यास केला जातो.

याशिवाय मेंढीपासून प्राप्त होणारी लोकर, मांस, लेंडीखत यावर सुधारित प्रक्रिया करण्याबाबतचे संशोधनसुद्धा होते. संपूर्ण देशातून या संस्थेत विद्यार्थी उच्चशिक्षणाकरिता येतात. यासंदर्भात संतोष महात्मे यांनी सांगितले, महाराष्ट्रात भटकंती करणाऱ्या मेंढपाळांच्या विविध समस्या आहेत. मात्र योग्य माहिती व तंत्रज्ञानाच्या अभावाने ते पारंपरिक पद्धतीने पशुपालन करून जीवन जगताहेत. ऋतू नुसार उपलब्ध चारा पशूंना देतात.

त्यामुळे पशूंचे योग्यरीत्या पालन होत नाही. त्यांचे वजन सुद्धा कमी होते व मेंढपाळांना आर्थिक लाभ फारसा मिळत नाही. त्यामुळे आता या अग्रणी संस्थेच्या माध्यमातून संशोधित होणारे तंत्रज्ञान, नवीन प्रयोगांची माहिती, खतांवरील प्रक्रिया उद्योगाची माहिती मेंढपाळापर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने हा करार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी संस्थेचे संचालक डॉ. अरुणकुमार तोमर, डॉ. विनोद कदम, डॉ. एल. आर. गुर्जर, मेंढपाळ प्रोड्युसर कंपनीच्या वतीने संतोष महात्मे, रमेश ढवळे, निखिल ठाकरे, प्रवीण भुजाडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

या सामंजस्य करारामुळे आमच्या संस्थेला नवीन प्रगत तंत्रज्ञान, प्रक्रिया उद्योगाची वेळोवेळी माहिती मिळू शकणार आहे. एकंदरीत अद्ययावत तंत्रज्ञान मेंढपाळ बांधवांपर्यंत पोहोचविण्याचा हा एक प्रयत्न आहे.

- संतोष महात्मे, संस्थापक अध्यक्ष,मेंढपाळ धनगर विकास मंच.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT