Got married at the gate of the police station in Bhandara district 
विदर्भ

एका प्रेमाची दुसरी गोष्ट; चक्क पोलिस स्टेशनच्या गेटवर झाले शुभमंगल, वराला आधीच बायको

मोहित खेडीकर

लाखनी (जि. भंडारा) : वेळ रात्री ८ वाजताची... स्थळ लाखनी पोलिस स्टेशनचे प्रवेशद्वार... वधू-वराच्या डोक्यावर अक्षता पडतात... नवरदेव नवरीच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो... दोघेही एकमेकांना हार घालतात अन् झटपट शुभमंगल पार पडले. हे वाचून तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण, ‘व्हॅलेंटाइन डे’च्या रात्री हा प्रकार घडला.

साधारणपणे एखादा विवाह सभागृहात किंवा लॉन्समध्ये पार पडतो. सनई-चौघड्यांचा मंजूळ स्वर व वऱ्हाड्यांची उपस्थिती असते. मात्र, प्रेमदिनी लाखनीत पार पडेल्या विवाहाची बातच न्यारी. कारणही तसेच आहे. हा विवाह चक्क पोलिस स्टेशनच्या प्रवेशद्वारावर पार पडला. ते झाले असे की, सचिन व मनीषा (बदललेले नाव) यांच्यात गत तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दरम्यान, मनीषाला दिवस गेले. यानंतर सचिन मनीषासोबत लग्न करण्यास टाळाटाळ करीत होता.

या प्रकाराला कंटाळून मनीषा थेट ठाण्यात पोहोचली व रितसर तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी कारवाई करीत सचिनला ताब्यात घेतले. दोघांचीही कुटुंबीय ठाण्यात पोहोचले.

बराच वेळ वादावादी झाल्यानंतर कुटुंबीयांनी दोघांचेही ठाण्याच्या प्रवेशद्वारावर लग्न लावून देण्याचे ठरवले व बघ्यांच्या उपस्थितीत वधू-वराच्या डोक्यावर अक्षता पडल्या. खरं तर १४ फेब्रुवारी हा दिवस सच्च्या प्रेमविरांचा आहे. मात्र, या प्रेमाच्या विशेष दिवशी अशाप्रकारची अनैतिक प्रेमकहाणी पुढे आल्याने एकच चर्चा होती.

सचिनला आधीच एक बायको

लाखनीजवळच्या एका खेड्यातील रहिवासी असलेल्या सचिनने दोन महिन्यांपूर्वीच अन्य एका मुलीसोबत आंतरजातीय प्रेमविवाह केला आहे. त्यामुळे आधीच घरी एक बायको आहे. वरून दुसरीसोबत असलेल्या लफड्याचे बिंग फुटल्याने सचिनने महामार्गावर भरधाव ट्रकसमोर उडी घेऊन जीव देण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांनी वेळीच धाव घेतल्याने त्याचा जीव वाचला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे यांच्या पराभवाची ५ कारणं; दोघांचं भांडण, महेश सावंतांचा लाभ

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: नाईकांचा डाव फसला, मंदा म्हात्रेंचा अखेरच्या क्षणी विजय

Parag Shah Won in Ghatkopar East Assembly Election: घाटकोपर पूर्व मतदार संघावर भाजपचा झेंडा कायम; पराग शाहांचा मोठ्या फरकाने विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: माळशिरसात सातपुते २०७५ मतांनी पिछाडीवर

महायुती २०० पार, तर मविआची अनेक जागांवर हार, जाणून घ्या सर्व पक्षांच्या 'स्ट्राइक रेट'चा अहवाल

SCROLL FOR NEXT