He broke into the girl's house and threatened to kill brother 
विदर्भ

असेल तुझी बहीण, आता ही माझी आहे... आमच्यामध्ये पडलास तर ठार मारेल

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : शहरात महाविद्यालयीन युवतींच्या छेडखानीच्या घटना वाढत आहेत. लॉकडाउनमुळे युवती घराबाहेर पडत नसल्यामुळे घरात घुसून छेडखानी करण्यापर्यंत काही मजनूंची मजल गेली आहे. मागील काही दिवसांपूर्वी युवकाने युवतीचा कॉलेज समोरच चाकू मारून खून केला होता. यामुळे मुलींमध्ये भीतीचे वातावरण आहे. असे असताना एका युवकाने चक्‍क मुलीच्या घरात शिरून भावाला "ही माझी आहे, आमच्यामध्ये पडलास तर ठार मारेल' अशी धमकी दिली. या घटनेमुळे मजनूंची हिंमत चांगलीच वाढली असल्याचे दिसून येते. 

प्राप्त माहितीनुसार, अमरावती शहरात फ्रेजरपुरा ठाण्याच्या हद्दीत दस्तूरनगर भागात 19 वर्षीय युवती राहते. ती महाविद्यालयीन विद्यार्थिनी आहे. विशाल बाबर (रा. कमल कॉलनी) हा तिच्यावर एकतर्फी प्रेम करतो. विशाल हा काही दिवसांपासून युवतीच्या महाविद्यालयासमोर जाऊन पाठलाग करीत होता. मात्र, युवतीने याकडे दुर्लक्ष केले. तरीही विशाल पाठलाग करीत असल्याने युवतीने बजावले होते. मात्र, त्याने "तू मला आवडले, माझ्याशी प्रेमसंबंध ठेवण्याची' मागणी केली होती. यावेळी युवतीने विशालला स्पष्ट शब्दात नकार दिला होता. 

मात्र, विशालच्या वर्तनात कोणताही फरक पडत नसल्याचे बघून युवतीने आपल्या कुटुंबीयांना याची माहिती दिली. तरीही विशालकडून पाठलाग करणे काही केल्या कमी होत नव्हते. युवती सतत विशालला टाळत होती. ही बाब मात्र विशालला खटकत होती. युवती टाळत असल्याचा प्रकार असाह्य झाल्यामुळे विशालने कशाचाही विचार न करता थेट युवतीच्या घरात प्रवेश केला. तिच्यापुढे प्रेमाचा प्रस्ताव ठेवून मन वळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, युवतीने नकार दिला. यामुळे चिडलेल्या विशालने युवतीसोबत बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. 

तक्रारीवरून गुन्हा दाखल

विशाल चक्‍क युवतीच्या घरात घुसून प्रेमाची मागणी घालू लागला. मात्र, युवतीने त्याला नकार दिला. यामुळे युवतीच्या भावाने त्याला निघून जाण्यास सांगितले. मात्र, विशालने उलट तिच्या भावालाच धमकी दिली. "ही माझी आहे. आमच्यामध्ये पडलास तर ठार मारेल' अशी धमकी विशालने दिली. वैतागलेल्या युवतीने घटनेची तक्रार फ्रेजरपुरा ठाण्यात नोंदविल्यानंतर पोलिसांनी विशाल बाबरविरुद्ध विनयभंग, ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivajinagar Assembly Election 2024 Result: सिद्धार्थ शिरोळे 36 हजार मतांनी विजयी; सलग दुसऱ्यांदा आले निवडून

Assembly Election Result Viral Memes : महायुतीचा एकतर्फी विजय अन् महाविकास आघाडीचा सपशेल पराभव; सोशल मीडियावर आली Memes ची लाट

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: बेलापूरमध्ये भाजपच्या मंदा म्हात्रे विजयी

Rajesh Kshirsagar Won Kolhapur North Assembly Election : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT