ravi  
विदर्भ

Video : इच्छा तिथे मार्ग! कोरोना संकटातही स्वयंरोजगार करून तो भरतोय कुटूंबियांचे पोट

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन घोषित झाल्याने उदरनिर्वाहाचे सर्वच मार्ग जवळपास बंद झाले. तळहातावर पोट असणाऱ्यांचे हाल झालेत आणि अद्यापही होत आहेत. या परिस्थितीत एका युवकाने स्वयंरोजगाराला जुगाडचा आधार दिला. आता त्याच्या घरातील दोन्ही वेळची चूल पेटू लागली आहे.

रवी झोंबाडे, असे युवकाचे नाव आहे. तो मूळचा वाशीम जिल्ह्यातील रहिवासी आहे. आईवडील, भाऊ, पत्नी, दोन मुले, असे त्याचे कुटुंब आहे. पत्नी आणि दोन मुलांसह तो अमरावतीच्या यंकय्यापुरा परिसरात भाड्याने खोली घेऊन राहतो. तो टॅक्‍सी चालक आहे. एका एजन्सीकडे तो चालक म्हणून कामाला होता. मात्र दीर्घ पल्ल्याच्या प्रवासाहून आल्यानंतर विश्रांती न घेता त्याला दुस-या ठिकाणी जावे लागत होते. या नोकरीचा त्याला कंटाळा आला, पण पर्याय नसल्याने तो कुटुंबासाठी तो ती नोकरी करीत होता.

एकदा गावात घरकुलाच्या कामानिमित्ताने गेला असता परतीला विलंब झाल्याने एजन्सी मालकाने त्याला कामावरून कमी केले. अशातच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउनची घोषणा झाली. पोट भरताना दमछाक होऊ लागली. जवळची मोजकी पुंजी खर्च होऊ लागली. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी काय करावे, असा विचार त्याने सुरू केला. त्याने पंक्‍चर दुरुस्तीचे दुकान लावण्याचे ठरविले. त्यासाठी हवा भरण्याचे यंत्र एकाकडून विकत घ्यायचा विचार केला. त्याने त्याची कींमत अव्वाच्या सव्वा सांगितली. ती रक्कम तो मोजू शकत नव्हता.



मग त्याने त्याच्याकडे असलेल्या जुनाट दुचाकीचा उपयोग करण्याचे ठरविले. एका दुचाकी मेकॅनिकची भेट घेतली आणि दुचाकीच्या लहान चेनव्हीलवर कॉम्प्रेसर बसवून देण्याची विनंती केली. चेनव्हीलच्या शॉफ्टमध्ये किंचित बदल करून त्यावर कॉम्प्रेसरचा बेल्ट लागेल अशी पुल्ली बसवून घेतली आणि बाजूला हवा तयार करणारे कॉम्प्रेसर बसविले. त्यानंतर दुचाकीच्या मागील आसनाचा काही भाग कापून त्यावर हवेची टाकी बसविली. दुचाकी चालू केल्यानंतर अवघ्या दहा मिनिटांमध्ये टाकीत हवा भरली जाते.

जेव्हा त्याला ये-जा करण्यासाठी दुचाकीची गरज भासते, तेव्हा तो पुल्ली व कॉम्प्रेसरला लावलेला रबरी बेल्ट बाजूला काढून व्हीलवर चेन चढवितो आणि दुचाकी वापरतो. बाहेरगावी जायचे असल्यास हवेची टाकी आणि कॉम्प्रेसरसुद्धा बाजूला काढून ठेवण्याची व्यवस्था त्याने केली आहे. कॅम्प मार्गावर रस्त्याच्या कडेला एका झाडाखाली तो पंक्‍चर दुरुस्तीचे काम करतो आहे.

सविस्तर वाचा - बेटा शिवसेना का पॉवर हैं.. अख्खा फॅमिली को उडा दूंगा

या व्यवसायातून दिवसाला दोनशे, तीनशे रुपये सहज मिळतात, परंतु लॉकडाउनमुळे पंक्‍चर दुरुस्तीवरसुद्धा परिणाम झालेला आहे, असे त्याने सांगितले. परिस्थिती माणसाला बरेच काही शिकवते, असे म्हणतात. लॉकडाउनच्या कालावधीत जुगाडामुळे कुटुंबाची उपासमार टळली, असे सांगत हेही दिवस निघून जातील, या अपेक्षेने तो कोरोना संकटाकडे बघतो आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Hitendra Thakur: तावडे पैसे देताना कुणाला घावले? २५ फोन, ५ कोटी अन् सर्व प्रकरण बाहेर काढणारे हितेंद्र ठाकूर कोण?

Vinod Tawde VIDEO: विनोद तावडेंना बविआ कार्यकर्त्यांनी हाॅटेलमध्ये घेरलं, पैसे वाटल्याचा आरोप करत घातला राडा, काय घडलं नेमकं?

Nanded South Assembly constituency : नांदेड-दक्षिण मतदारसंघात विजयश्री कोणाला घालणार माळ, नवीन चेहऱ्याचा ट्रेंड कायम राहणार का?

Flipkart Mobiles Bonanza Sale : महागड्या मोबाईलवर मिळतोय बंपर डिस्काउंट; सुरू झाला फ्लिपकार्टचा Bonanza सेल, ऑफर्स पाहा

Satara Assembly Election 2024 : तुमच्यामुळेच संस्था अडचणीत; पसरणीत अरुणादेवी पिसाळ यांची टीका

SCROLL FOR NEXT