वर्धा : हिंगणघाट येथील अंकिता पिस्सुडे यांच्या जळीतकांडात न्यायालयीन कामकाजाच्या प्रक्रियेला वेग आला आहे. या प्रकरणाची सुनावणी उद्या सोमवारी (ता. 14) पासून सुरू होणार आहे. या सुनावणीसाठी सरकारी वकील उज्वल निकम हिंगणघाट येथे दाखल होणार आहेत. महाराष्ट्रात बहुचर्चित असलेल्या या प्रकरणाकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत.
या प्रकरणातील या आरोपी विकेश नगराळे याच्याविरुद्ध 426 पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. घटनेनंतर 26 दिवसांत पोलिसांनी हे आरोपपत्र दाखल केले होते. कोविडमुळे थांबलेल्या या न्यायालयीन कामकाजाला आता वेग आला आहे. हिंगणघाट येथेच अतिरिक्त सत्र न्यायालयात खटला चालविण्यात येणार आहे. यात पहिल्या दिवशीच्या न्यायालयीन कामकाजाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
हिंगणघाट येथे ३ फेब्रुवारी २०२० रोजी प्राध्यापक तरुणीवर पेट्रोल टाकून जाळल्याची घटना घडली होती. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात पडसाद उमटले होते. पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर सर्वत्र मोर्चे काढून त्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली होती. या बहुचर्चित जळीत प्रकरणाचे उद्यापासून कामकाज सुरू होणार आहे.
आरोपी नागपूर न्यायालयात -
या प्रकरणाचा आरोपी विकेश ऊर्फ विक्की नगराळे सध्या नागपूर कारागृहात बंदिस्त आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तीन महिन्यात निकाल लावण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, कोरोनामुळे न्यायालयीन प्रक्रियेला विलंब झाला.
हेही वाचा - हॉटेल, बारमध्ये उशिरानंतरही वर्दळ; पोलिस आयुक्तांच्या अचानक भेटीमुळे ठाणेदारांची तारांबळ
फास्ट ट्रॅकची परवानगी रखडली -
या प्रकरणात 426 पानांचे आरोपपत्र पोलिसांनी 28 फेब्रुवारीला न्यायालयात दाखल केले आहे. सुरुवातीच्या काळात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून फास्ट ट्रॅक वर्धेला उपलब्ध करण्यासाठी अर्ज करण्यात आला होता. मात्र, अद्यापपर्यंत परवानगी न मिळाल्याने हिंगणघाट येथे या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. हिंगणघाटच्या न्यायालयात उद्यापासून कामकाज सुरू होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.