heavy rain expected on 16 and 17 february in vidarbha 
विदर्भ

विदर्भात आज अन् उद्या गारपीटीसह पावसाची शक्यता, गहू उत्पादकांसमोर पुन्हा संकट

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : हवामान खात्याने सांगितलेल्या अवकाळी पावसाच्या अंदाजाने गहू व हरभरा उत्पादक शेतकरी चांगलाच धास्तावला आहे. खरीप हंगामात पावसाच्या लहरीपणामुळे पोळलेल्या शेतकऱ्यांसमोर पुन्हा एकदा संकट उभे ठाकले आहे.

यावर्षी खरीप हंगामात पावसामुळे सोयाबीन, कापूस, मूग व उडदासह तुरीचे मोठे नुकसान झाले आहे. रब्बी हंगामातील गहू व हरभऱ्यावर शेतकऱ्यांची भिस्त अवलंबली आहे. हरभऱ्याची पेरणी यंदा गव्हाच्या तुलनेत अधिक असून काही भागांतील हरभरा कापणीवर आला आहे, तर काही ठिकाणी तो विक्रीसही आला आहे. गव्हाची पेरणी आटोपली असून काही भागांतील गहू ओंबीवर आला आहे. गव्हाला सर्वाधिक धोका गारपिटीचा असून अवकाळी पावसासोबत गारपिटीचीही शक्‍यता वर्तवण्यात आल्याने शेतकऱ्यांचे धाकधूक वाढली आहे. 

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातील गेल्या काही दिवसांत कमी झालेले तापमान आता पुन्हा चढू लागले आहे. दक्षिणेकडून वारे वाहण्यास सुरुवात झाल्याने तापमानात वाढ होऊ लागली आहे. मध्य महाराष्ट्रावर 900 मीटर उंचीवर वाहत असलेले चक्राकार वारे आणि येथून केरळपर्यंत असलेली कमी दाबाची द्रोणीय स्थिती, सोबतच पूर्वेकडून हवेच्या खालच्या स्तरात वाहत असलेले बाष्पयुक्त वारे, या सर्व हवामान शास्त्रीय परिस्थितीमुळे 16 व 17 फेब्रुवारीला विदर्भात तुरळक ठिकाणी गडगडाट आणि विजांसह हलक्‍या मध्यम पावसाची शक्‍यता आहे. तसेच एखाद दोन ठिकाणी गारपीट होण्याची शक्‍यता आहे.

वातावरणातील बदल शेतकऱ्यांच्या मुळावर उठला असून 16 फेब्रुवारीस पूर्व विदर्भात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्‍यता आहे, तर 17 व 18  फेब्रुवारीस पश्‍चिम विदर्भ व मराठवाड्यातील काही ठिकाणी वादळी पाऊस राहील. तसेच तुरळक भागात गारपिटीची शक्‍यता आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT