विदर्भ

जीवनावश्‍यक वस्तूंच्या नावावर माणसांची जत्रा; शहरातील गर्दी कमी होईना

सुधीर भारती

अमरावती : जीवनावश्‍यक वस्तूंच्या (Essential things) खरेदीच्या नावाखाली संचारबंदीच्या (Amravati Lockdown) काळातही शहरात दररोज माणसांची जत्रा भरत आहे. भाजीबाजार असो की गांधी चौक असो, सर्वत्र गजबज दिसून येत असून निर्बंध केवळ नावापुरतेच उरले की काय? असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. जिल्हा प्रशासनाकडून सकाळी सात ते 11 या वेळेत जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने, भाजीबाजार, फळविक्रीच्या दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र या सुटीचा लाभ घेत अमरावतीकर भाजीपाला, फळे, किराणा घेण्यासाठी एकच गर्दी करीत आहेत. (Huge crowd gathering at markets of Amravati)

पहाटेच्या वेळी बाजार समितीच्या भाजीपाला यार्डमधील गर्दी पाहून कोरोना संपला की काय? अशी शंका येते. विनामास्क अनेक भाजीविक्रेते तसेच नागरिकांचा मुक्त वावर याठिकाणी होत आहे. याशिवाय रस्त्याच्या कडेला विक्रीसाठी आलेल्या भाजीपाल्याच्या दुकानांवर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडविण्यात येत आहे. विशेष म्हणजे इतवारा बाजार, चित्रा चौक, रुक्‍मिणीनगर, राजापेठ, रवीनगर, बियाणी परिसर या भागातील गर्दी पाहता कोरोना संपला की काय? अशी शंका येते. विशेष म्हणजे मागील काही दिवसांपासून कारवाईसुद्धा थंडबस्त्यात पडल्याचे चित्र आहे.

संचारबंदीतही रुग्णवाढ कशी?

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर राज्य शासनाच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाकडून संचारबंदी आदेश लागू करण्यात आले. त्यानुसार 11 नंतर जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने बंद करण्याचे निर्देश आहेत, मात्र त्यानंतर सुद्धा शहराच्या विविध भागांमध्ये लपूनछपून व्यवसाय केले जात आहे. त्याचाच परिणाम म्हणून आता दररोजची रुग्णसंख्या एक हजारावर पोहोचली आहे. त्यामुळे या संचारबंदीच्या अंमलबजावणीवरच शंका निर्माण झाली आहे.

गांधी चौक मार्गावर चक्‍काजाम

सकाळच्या वेळी गांधी चौक ते अंबादेवी पुलाच्या मार्गावर दररोज वाहतुकीची कोंडी होत आहे. भाजी तसेच फळविक्रेत्यांनी पुलाच्या बाजूलाच आपली दुकाने थाटल्याने अर्धा रस्ता अतिक्रमित झाला आगे. तेथून वाट काढताना चारचाकी व दुचाकी चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. शिवाय येथून भाजीपाला घेणाऱ्यांची वाहने रस्त्यांवरच उभी केली जातात.

(Huge crowd gathering at markets of Amravati)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: चंदगड मतदारसंघात शिवाजी पाटीलआघाडीवर

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT