husband attacked on wife and she is no more in Amravati  
विदर्भ

सासऱ्यांना बाहेर पाठवत पत्नीच्या डोक्यावर केले वार; मृत्यू होताच काढला पळ; पतीचा शोध सुरु 

सायराबानो अहमद

धामणगावरेल्वे (जि. अमरावती) ः चारित्र्याच्या संशयावरून माहेरी असलेल्या पत्नीची पतीने हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार धामणगावरेल्वे तालुक्‍यातील तिवरा गावात घडला. पहाटे पाचच्या सुमारास ही खळबळजनक घटना उजेडात आली.

प्रगती सोमेश्‍वर मेहरे (वय 25), असे खून झालेल्या महिलेचे नाव असून पोलिसांनी याप्रकरणात तिचा पती सोमेश्‍वर मेहरे (वय 35) याचा शोध सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पती-पत्नींचे वारंवार खटके उडत होते. यापूर्वीसुद्धा पत्नीने कुऱ्हा पोलिस ठाण्यात पती विरोधात तक्रार दाखल केली होती. तिवरा येथील कैलास सावळीकर यांच्या प्रगती नामक मुलीचा विवाह चांदूररेल्वे तालुक्‍यातील आमलाविश्‍वेश्‍वर येथील सोमेश्‍वर मेहरे यांच्यासोबत झाला होता. 

आमला येथे नेहमी वाद होत असल्याच्या कारणाने प्रगती ही माहेरी येऊन राहत होती. पत्नीला आमला येथे नेण्यासाठी दोन-तीन दिवसांपूर्वी सोमेश्‍वर सासरी कैलास सावळीकर यांच्याकडे आला होता व मुक्कामी होता. पत्नी प्रगती झोपेत असताना संशयित आरोपी सोमेश्‍वरने लाकडी बल्लीने तिच्या डोक्‍यावर जबर प्रहार करून पळ काढला. यात प्रगतीचा मृत्यू झाला. प्रकरणी तळेगावदशासर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून पतीचा शोध सुरू केला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी पूनम पाटील यांनी घटनास्थळाला भेट दिली. त्यांच्या मार्गदर्शनात तळेगावदशासरचे ठाणेदार अशोक कांबळे हे अधिक तपास करीत आहेत.

असा घडला थरार...

रात्रीपासून कुरबूर सुरू असतानाच पहाटे साडेपाचच्या दरम्यान सोमेश्‍वरने आपल्या सासऱ्यास पेट्रोल आणण्यासाठी दुचाकी घेऊन पाठवले. सासरे बाहेर गेल्यानंतर एका मोठ्या दंडुक्‍याच्या साह्याने झोपलेल्या प्रगतीवर त्याने दोन प्रहार केले. त्यापैकी एका वाराने प्रगतीच्या मेंदू व कवटीला जबर दुखापत झाली. त्यातच तिचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सदर प्रकारानंतर सोमेश्‍वरने सासरे आल्यावर तुम्ही घरी जा, मी गावी जातो, असे म्हणून दुचाकीवर बसून निघून गेला.

चांदूरच्या रेल्वेथांब्यावर ठेवली दुचाकी

सदर खळबळजनक प्रकारात तळेगावदशासर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता सोमेश्‍वर मेहरे याची दुचाकी चांदूररेल्वे थांब्यावर पार्किंगमध्ये ठेवलेली आढळली. त्यावरून सोमेश्‍वर हा सकाळच्या विदर्भ एक्‍स्प्रेसने नागपूर-गोंदियाच्या दिशेने पळाल्याचा संशय आहे. पोलिसांनी नागपूर-गोंदियाच्या दिशेने तपासणी पथक रवाना केले.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT