Coin Telephone Sakal
विदर्भ

Coin Telephone : मोबाइलच्या युगात ट्रिंग ट्रिंग करणारा कॉइन बॉक्स झाला इतिहासजमा

Coin Telephone History : आता राहिल्या आठवणी; एक रुपयाच्या नाण्यात संवाद साधण्याची होती सोय

सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली : कधी काळी ट्रिंग ट्रिंग करणाऱ्या टेलिफोनची चैन परवडत नसणाऱ्या नागरिकांसाठी एक रुपयाचे नाणे टाकून काही मिनिटे बोलण्याचे संधी देणारे एसटीडी बुथवरील काॅईन बाॅक्सचे फोन अतिशय जिव्हाळ्याचे असायचे. पण आता अत्याधुनिक मोबाईल तळहातावर विसावल्यानंतर हे काॅइन बाॅक्स इतिहासजमाच झाले आहेत.

ग्रामीण भागात दूरसंचार विभागाकडून बाहेरगावी संपर्कासाठी फोन सुविधा केली होती. सार्वजनिक ठिकाणावर नागरिकाला संपर्क साधून माहिती घेण्यास हाॅटेल, पानटपरी, विविध मार्गांवर एक रुपयांत कॉइन बॉक्सद्वारे संपर्क करण्याचे नियोजन केले होते.

कालांतराने मोबाइल सुविधा निर्माण झाली. सर्वसामान्य नागरिक जवळपास आपल्या ऐपतीप्रमाणे मोबाइल खरेदी करतात. त्यामुळे कॉइन बॉक्स आता मात्र आठवणीत राहिले आहेत. देशात टपालनंतर फोन सुविधा उपलब्ध करण्यात आली.

पण प्रत्येक नागरिक फोन खरेदी करून कनेक्शन घेऊ शकत नसल्याने सार्वजनिक कॉइन बॉक्स दूरसंचार विभागाकडून उपलब्ध झाले आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात संपर्क साधण्याचे साधन उपलब्ध झाले.

ते पण अल्पदरात १ रुपयाचे नाणे टाकून कॉइन बॉक्सरवर संपर्क साधून माहिती घेण्यास सुविधा उपलब्ध झाली. हे कॉइन बॉक्स तर मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी राज्य मार्गावर, चौकात, हॉटेल, पानटपरी या ठिकाणी दिसून येत होते.

कॉइन बॉक्स दिसला की आधी एक रुपया नाणे खिशात ठेवून कॉइन बॉक्सचा फोन करण्यासाठी रांगा लागत होत्या. सुरुवातीला अल्पदरात दूरसंचार कॉइन बॉक्स सेवा मोठ्या प्रमाणात चालत होती. पण कालांतराने यांत्रिकयुगात नवनवीन अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करण्यात येत असल्याने मोबाइल सुविधा निर्माण झाली.

एक तरी मोबाइल खरेदी करून संपर्क करण्यास सुविधा उपलब्ध झाली, तरीही कॉइन बॉक्स मोठ्या प्रमाणात चालत होते. पण सर्वसामान्य नागरिकाला आपल्या खिशाला परवडणारे अल्पदरात मोबाइल खरेदीस उपलब्ध झाले आणि काॅइन बाॅक्सला अवकळा आली. आज प्रत्येक शाळेतील मुलापासून आजी-आजोबापर्यंत मोबाइल वापरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे कॉइन बॉक्सचा वापर कमी होत गेला. आज कॉइन बॉक्स बघायलासुद्धा मिळत नाहीत.

आता दर्शन चित्रपटात

पूर्वी गल्लोगल्ली,नाक्यावर, रस्त्याच्या कडेला दिसणारे टेलिफोन बूथ आणि त्यात दिसणारे किंवा दुकानात गल्ल्यावर बसलेल्या मालकाच्या बाजुलाच काउंटरवर असणारे काॅइन बाॅक्स लुप्त झाले आहेत. मोबाईल युगात जन्मलेल्या आजच्या बच्चे कंपनीला या काॅइन बाॅक्सची कल्पनाही करता येणार नाही.

मात्र ९० च्या दशकातील अनेक चित्रपटांत हे काॅईन बाॅक्स दिसायचे. अनिल कपूरचा भाऊ संजय कपूर याचे अनेक चित्रपट सुपरफ्लाॅप ठरले असले, तरी त्याचा सिर्फ तुम हा गाजलेला चित्रपट एक अजरामर कलाकृती आहे.

या नायिका असलेली प्रिया गिल काॅइन बाॅक्सवरूनच नायकाला फोन करते, अक्षयकुमार, प्रिती झिंटाच्या अभिनयाने नटलेल्या संघर्ष चित्रपटात, तर मुझे रात दिन बस मुझे चाहती हो, हे संपूर्ण गाणं अमन वर्मा चक्क टेलिफोन बुथवरच गातो. अशा अनेक चित्रपटांतूनच काॅइन बाॅक्स बघावा लागणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT