यवतमाळ : केंद्र सरकारने सर्वत्र रस्त्याचे जाळे विणले. त्यासाठी रस्त्याला लागून असलेली शेती संपादित केली. शेतकऱ्यांचा होणारा विरोध लक्षात घेता, मोठी रक्कम मोजली. शेतीला मोल आल्याचे दिसताच भाऊबंदकीमधील कुणीही हक्क सोडायला तयार नाहीत. परिणामी पैशापेक्षाही अनमोल असलेल्या नात्यात कटुता आल्याचे जळजळीत वास्तव आहे.
समृद्धी महामार्ग, नागपूर-तुळजापूर मार्ग, रेल्वे प्रकल्पासाठी शेतकऱ्यांची हजारो हेक्टर जमिन संपादित करण्यात आली. त्यासाठी शासनाने रक्कमही चांगली मोजली. रस्त्याला लागून असलेली मात्र, उत्पन्न कमी निघत असल्याने अनेक कुटुंबांनी त्याकडे दुर्लक्ष केले. तोंडी हिस्सेवाटणीत कमजोर असलेल्या भावाकडे जमीन दिली. विकासाकडे पाऊल पडताच शेतजमिनीला मोल आले. कालपर्यंत आपल्याला काही नको म्हणणारे नात्यामधील भाऊ, बहिणीला करोडपती झाल्याची स्वप्नं पडायला लागली. कालपर्यंत एका झटक्यात स्वाक्षरीसाठी तयार असणाऱ्या नातेवाइकांनी हिस्सासाठी हात पुढे केला. आपला हिस्सा मिळाला, तरच स्वाक्षरी करू, असा पवित्रा घेतला. प्रकरण न्यायालयात जाण्याऐवजी भूसंपादनाच्या पैशांची हिस्सावाटणी केली. मात्र, त्यानंतर रक्त्यातील नाते दुरावले गेले आहे. वर्धा, नागपूर, यवतमाळ, अमरावती या जिल्ह्यांत अनेकांची मने दुरावल्या गेल्याचे चित्र आहे.
पैशांचा वापर जपूनच -
राज्यात मागील काही वर्षांत प्रकल्पांची निर्मिती झाली. त्यासाठी शेतकऱ्यांची जमिन संपादित करण्यात आली. हाती आलेली रक्कम घेत प्रकल्पग्रस्त कुटुंबांनी दुसऱ्या गावची वाट धरली. अनेकांनी या पैशांचा सदुपयोग न करता उधळपट्टी केली. त्यामुळे सधन म्हणून मिरविणाऱ्यांच्या हातात आता कवडीही शिल्लक राहिली नाही. काहींनी शेती विकत घेऊन आपले आयुष्य सावरले. त्यामधून अनेकांनी बोध घेतला असून, पैशांचा वापर जपूनच केला जात आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.