Khambgaon sakal
विदर्भ

Khambgaon : खामगाव जिल्हा होण्याच्या दिशेने

Khambgaon : खामगाव जिल्हा होण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे, जिथे नवीन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापन करण्यात आले आहे. या निर्णयामुळे खामगावच्या जिल्हा निर्मितीच्या मागणीला गती मिळणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

खामगाव : गेल्या अनेक वर्षांपासून खामगाव जिल्हा करण्याची मागणी होत आहे. तसा प्रस्तावही शासनाकडे पाठविण्यात आला असून अद्यापही याबाबत निर्णय झालेला नाही. मात्र शासनाचे खामगाव जिल्ह्या होण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या असून गुरुवारी ता. ३ ऑक्टोबर रोजी खामगाव येथे एमएच ५६ या नोंदणी क्रमांकासह उपप्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापन करण्याबाबत शासन निर्णय झाला आहे. त्यामुळे आता एम एच २८ नव्हे तर एम एच ५६ लागणार आहे.

खामगाव येथील वाहन नोंदणी संख्या, एकूण लोकसंख्या यांचा विचार करता स्वतंत्र उप प्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापन करणेबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्याला आज मान्यता देण्यात आली आहे. शासन निर्णयानुसार खामगाव, जि. बुलडाणा येथे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी दर्जाचे एमएच ५६ या नोंदणी क्रमांकासह नवीन कार्यालय सुरु करण्यास याद्वारे शासन मान्यता देण्यात येत आहे.

बुलडाणा जिल्हा भौगोलिकदृष्ट्या मोठा असल्यामुळे जिल्ह्याचे घाटावर व घाटाखाली असे दोन भाग विभागले गेले आहेत. घाटाखालील लोकांच्या सोयीचे होण्यासाठी खामगाव जिल्हा निर्मितीची मागणी अनेक वर्षांपासून होत आली आहे.प्रस्तावित खामगाव जिल्ह्यात मलकापूर, नांदुरा, शेगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर खामगाव तालुक्यातील गावांचा समावेश राहणार आहे. तसेच नवीन लाखनवाडा तालुक्याची मागणी होत आहे. खामगाव नवीन जिल्ह्याबाबत सरकारकडे प्रस्ताव देखिल पाठविण्यात आला आहे. 

याबाबत अनेक नेत्यांनी आश्वासने सुद्धा दिली आहेत. तर जिल्हा निर्मिती बाबतचा प्रस्ताव सुद्धा सरकारकडे पडून आहे. जिल्हा निर्मिती बाबत अद्याप कोणतीही घोषणा झाली नसली तरी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय मंजूर झाल्यामुळे जिल्हा निर्मितीच्या दृष्टीने हे एक पाऊल मानल्या जात आहे. तर या सोबतच अनेक प्रमुख कार्यालय या आधीच खामगाव शहरात असून प्रशासकीय दृष्टीने भव्य इमारत देखील आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: चंद्रचूड साहेब न्याय देण्याऐवजी टिप्पणीकार झाले होते; उद्धव ठाकरेंनी माजी सरन्यायाधीशांवर व्यक्त केली नाराजी

"आम्ही धनगर समाजाचा मुख्यमंत्री करून न्याय दिला, मात्र महाराष्ट्रात धनगरांना साधं आरक्षण दिलं जात नाही"

मोठी बातमी: रोहित शर्मा पहिल्या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियात होतोय दाखल, सोबत भारी गोलंदाजही टीम इंडियाच्या मदतीला येतोय

Israel PM Netanyahu: इस्रायली पंतप्रधानांच्या घरावर बॉम्ब हल्ला; संरक्षण मंत्री म्हणाले, आता हद्द झाली...

Latest Maharashtra News Updates live : बाळासाहेब ठाकरे पुतळ्याला शिवसेना (उबाठा) पक्षाचे अभिवादन

SCROLL FOR NEXT