नागपूर ः गेल्या अनेक दिवसांपासून रिकामं असलेलं प्रदेश काँग्रेसचं प्रदेशाध्यक्ष नक्की कोणाला मिळणार याबाबत अनेक तर्क लावण्यात येत होते. मात्र या सर्व चर्चांना पूर्णविराम देत आज प्रदेश काँग्रेसनं प्रदेशाध्यक्ष आणि प्रदेश कार्यकारिणीची घोषणा केली. यात विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि काँग्रेसचे बंडखोर नेते नाना पाटोले यांची प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष पदासाठी अनेक नावांची चर्चा असतानाही नाना पटोलेंनाच ही जबाबदारी का देण्यात आली? या मागची पार्श्वभूमी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
नाना पटोले यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात काँग्रेसमधून केली होती. मात्र त्यांना काँग्रेसमधून काहीही मिळालं नाही म्हणून त्यांनाही भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपकडून त्यांना लोकसभेचं तिकीटही देण्यात आलं होतं. भंडारा-गोंदिया मतदारसंघातून ते खासदार म्हणून निवडून आले. मात्र भाजपमधील अनेक मुद्द्यांबाबत त्यांचे मत वेगळे होते. त्यामुळे त्यांनी भाजपच्या खासदारकीचा राजीनामा देत पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ज्या काळात मोंदींच्या विरोधात बोलायला भलेभले घाबरत होते त्याकाळी त्यांनी पक्षात राहूनच मोदींशी पंगा घेतला त्यामुळे त्यांना अखिल किसान कॉंग्रेसचे अध्यक्ष करण्यात आले. या गुणांमुळेच नानांवर पक्षाचा दृढ विश्वास बसला.
हेही वाचा - आता प्रदेशाध्यक्षपदही विदर्भालाच, काँग्रेसचा 'हात' विदर्भाच्याच डोक्यावर का? वाचा स्पेशल...
कुठल्याच घोटाळ्यात नाव नाही
आतापर्यंत कुठल्याही घोटाळ्यात नाना पटोलेंचे नाव आलेले नाही. महाविकास आघाडीतील दोन्ही सहकारी पक्षांना सोबत घेऊन चालण्याचे कौशल्य त्यांच्यात आहे. तडजोड करताना प्रसंगी ते आक्रमकही होतात. भाजपमध्ये थेट मोदींशीच त्यांनी पंगा घेतला होता. भाजपबद्दल त्यांना चीड आहे. त्यांची अत्याचारी विचारधारा आहे, असे नाना नेहमी म्हणतात. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करताना विरोधी पक्ष भाजपवर ते भरपूर प्रहार करु शकतात.
हिंमतवान नेता म्हणून ओळख
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत श्रेष्ठींनी भाजपचे लोकप्रिय केंद्रीय मंत्री, नेते नितीन गडकरी यांच्या विरोधात लढण्यासाठी नानांना नागपुरात पाठवले. हे आव्हानही त्यांनी स्विकारले आणि नागपुरच्या मैदानात उतरले. नितीन गडकरींच्या विरोधात येथे ते लढूच शकणार नाहीत, नानांनी माघार घ्यावी, ही निवडणूक एकतर्फी होईल, असे बोलले जात होते. पण केवळ पक्षाने आदेश दिला म्हणून कसेतरी लढायचे, असे न करता नाना संपूर्ण ताकतीनीशी मैदानात उतरले आणि लढतीत रंग भरला.
नक्की वाचा - यवतमाळमधील आदिवासी नेते आणि माजी मंत्री शिवाजीराव मोघेंची काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती
स्वीकारले विधानसभा अध्यक्ष पद
विधानभेचे अध्यक्षपद नानांनी निमूटपणे स्विकारले. तेव्हाही प्रदेशाध्यक्ष होण्याची त्यांची सुप्त ईच्छा होतीच, असे बोलले जात होते. तरीही त्यांनी दिलेली जबाबदारी स्विकारली आणि समर्थपणे सांभाळली. निवृत्तीच्या वाटेवर आलेल्या नेत्यांना विधानसभेचे अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष बनवले जाते, अशी धारणा आत्ता आत्तापर्यंत होती.
संपादन - अथर्व महांकाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.