Kotwal died illegal sand tractor rs 6 lakh collected from revenue department employees Buldhana Marathi News  
विदर्भ

Buldhana News : मृत कोतवालच्या कुटुंबियांसाठी तहसीलदार बनले दूत; रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरमुळे झाला होता मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

संग्रामपूर (बुलढाणा) : संग्रामपूर तालुक्यातिल एकलारा बानोदा येथील कोतवाल मृतक लक्ष्मण अस्वार हे 16 एप्रिलच्या सायंकाळी तहसीलच्या पथकसोबत वाण नदीमध्ये विनापरवाना रेती वाहतूक करणारे वाहन पकडण्यासाठी गेले होते.

त्यामध्ये पलसोडा येथील ट्रॅक्टर चालक संतोष पारिसे याने कार्यवाहीच्या भीतीने नदी पात्रातून ट्रॅक्टर पळवून नेले. त्याला कोतवाल लक्ष्मण अस्वार यांनी अडविण्याचा प्रयत्न केला असता सदर चालकाने कोतवाल अस्वार यांचे पायावरून ट्रॅक्टर चालविला. यात लक्ष्मण अस्वार गंभीर जखमी झाल्याने तहसीलदार योगेश टोम्पे यांनी तातडीने उपचारासाठी अकोला रवाना केले. आणि पोलीस ठाण्यात जाऊन रात्रभर बसून त्या ट्रॅक्टरचा शोध घेण्यास सांगितले.

पोलिसांनी तातडीने 17 एप्रिल चे सकाळी ट्रॅक्टरसहित चालकाला ताब्यात घेऊन गुन्हे दाखल केला. हे होत असताना उपचारादरम्यान कोतवाल अस्वार यांचा मृत्यू झाला. यामुळे अस्वार यांचे कुटुंब उघड्यावर आले. कारण प्रमुखच हरवल्यानं पत्नी सह सर्व परिवार दुःखात गेला. त्या कुटुंबाला सावरण्यासाठी महसूल विभागाचे तहसीलदार योगेश टोम्पे यांनी अस्वार हे महसूल परिवारातील सदस्य असल्याने पुढाकार घेतला.

मानधन तत्वावर काम करत असल्याने कोतवालांना शासनाकडून इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ देय नसतात. म्हणून संग्रामपूर तालुक्याचे तहसीलदार योगेश्वर टोंपे यांनी महाराष्ट्रातील सर्व महसूल अधिकारी आणि कर्मचारी यांना मदत करण्यासाठी समाजमाध्यमांवर आवाहन केले होते.

त्या नुसार जिल्हाधिकारी यांच्यापासून ते कोतवालापर्यंत आणि सर्व महसुल यंत्रणेच्या कार्यालयीन कर्मचारी यांनी मयत कोतवालाच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी आर्थिक हातभार लावलाआणि ही एकूण 6,31,000 एवढी रकम आज पर्यत जमा झाल्याची माहिती तहसीलदार यांनी सकाळला दिली.

सोबतच स्थानिक तलाठी, मंडळ अधिकारी आणि तहसील कार्यालयीन सर्व कर्मचारी मिळून 61000 चा चेक मृत लक्ष्मण अस्वार यांच्या घरी जाऊन कुटूंबाकडे सुपूर्द केला. तहसीलदार यांनी कोतवाल हा परिवारातील सदस्य म्हणून त्या प्रति व्यक्त केलेली संवेदना आणि कार्य तत्परता पाहता प्रशासनाची बाजू भक्कम केली, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT