{"A?":"B","a":5,"d":"B","h":"www.canva.com","c":"DAERspJsD6g","i":"ZrGdgpLMmQdrSXyw0lSx8Q","b":1612953974032,"A":[{"A?":"I","A":46.125925056613994,"B":731.0246755821261,"D":140.20632745738774,"C":44.322882746526226,"a":{"B":{"A":{"A":"MAERm569oiM","B":1}, 
विदर्भ

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचं राजीनामा सत्र; जयंत पाटलांच्या दौऱ्यानंतर पद सोडण्याचा निर्णय 

सचिन शिंदे

आर्णी (जि. यवतमाळ) : आगामी निवडणुका लक्षात घेऊन राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसचा विस्तार करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे जिल्हा तसेच तालुक्याच्या ठिकाणी गेले होते. यवतमाळ जिल्ह्य़ातील पक्षाचा आढावा घेताना त्यांना अनेक पदाधिकारी हे केवळ पदे घेऊन निष्क्रिय असल्याची चर्चा झाली. 

आपल्या कामासाठीच पदाचा वापर होत असुन पक्षवाठीसाठी काहीच प्रयत्न होत नसुन पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या लोकांमध्ये जुन्या लोकांना डावलण्यात येत असल्याचे दिसून येते. त्यामुळे पक्षाचा विस्तार होतांना दिसुन येत नाही. जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवला जात नसुन मोजकेच कार्यकर्ते पद घेऊन बसलेले आहेत. नविन कार्यकर्ते जोडले जात नाही. अशा अनेक बोलक्या तक्रारी प्रदेशाध्यक्ष यांच्या कानी पडल्या ची चर्चा चांगलीच रंगली.

पक्ष संघटन मजबुत करायचे तर ते खिळखिळे झाल्याचा ठपका ठेवत जिल्ह्याच्या पक्षनेतृत्वाला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चांगलेच धारेवर धरले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी विधानपरिषद सदस्य ख्वाजा बेग यांनी आपल्या कडे असलेल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा जयंत पाटील यांच्याकडे सोपवला व पक्षातील कुरघोडीचा ठपका कार्यकर्त्यांच्या माथी मारून मोकळे झाले. 

आर्णी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाला चिटकून असलेल्या कार्यकर्तांची चांगलीच नाराजी झाली. त्यांनी सुद्धा ता 10 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता आर्णी येथील विश्राम गृहावर पत्रकार परिषद घेऊन आमच्या नेत्यावर झालेला अन्याय सहन होत नसल्याचा बोलून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्षक मुबारक तव्वर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अभिलाश इंगोले, राष्ट्रवादी युवककाँग्रेस शहराध्यक्ष चिराग शहा, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष सुनिल पोतगंटलवार, संदिप बुटले, शेखर खंदार, संजय व्यवहारे सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्रामधील मतमोजणीपूर्वी नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात जिलेबी बनवण्याची तयारी सुरु

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निवडून आल्यानंतरही पक्षासोबतच राहू; ठाकरेंनी लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT