विदर्भ

कुष्ठराेग, सिकलसेलचे रुग्णही दिव्यांग श्रेणीत

प्रवीण खेते

अकाेला: केंद्र सरकारच्या ‘दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016’ची अंमलबजावणी राज्यात सुरू करण्यात आली. त्याअंतर्गत कुष्ठराेग, सिकलसेल सारख्या 15 दिव्यांग प्रकारांचा नव्याने समावेश करण्यात आला. त्यामुळे आता 21 प्रकारच्या दिव्यांगांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.

केंद्र सरकारच्या दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016ची अंमलबजावणी राज्यात सुरू करण्यात आला आहे. या पूर्वीच्या कायद्यानुसार नेत्रदाेष, कर्णबधिरता, शारीरिक दिव्यांगता, मानसिक आजार, बौद्धिक दिव्यांगता आणि बहुदिव्यांगता सहा दिव्यांग प्रकार गणले जात हाेते.

कायद्यानुसार याच सहा प्रकारातील दिव्यांगांना दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र दिले जात हाेते. परंतु, केंद्र सरकारच्या दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 अन्वये 15 दिव्यांग प्रकारांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. यामध्ये शारीरिक वाढ खुंटणे, स्वमग्नता, मेंदूचा पक्षाघात, स्नायुंची विक्रुती, मज्जासंस्थेचे जुने आजार, अध्ययन अक्षमता, मल्टीपल स्न्लेराॅसिस, वाचा व भाषा दाेष, थॅलेसमिया, हिमाेफेलिया, सिकल सेल डिसीज दृष्टीक्षिणता आणि कुष्ठराेग आदींचा समावेश आहे. त्यामुळे आता या आजारांनी ग्रस्त रुग्ण देखील दिव्यांगांच्या श्रेणीत आले असून, त्यांना देखील दिव्यांग व्यक्त हक्क अधिनियमांतर्गत दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र दिले जाणार अाहेत.

असा करा आॅनलाईन अर्जा
तपासणी प्रत्येक जिल्ह्यातील संबंधित रुग्णालयातून करण्यात येणार आहे. त्यासाठी www.swavlambancard.gov.in या संकेत स्थळाला भेट देऊन आॅनलाईन अर्ज भरावा लागणार आहे.

अर्ज करण्यासाठी आवश्‍यक कागदपत्रे
आॅनलाईन अर्ज हा अर्जदाराने किंवा ताे सक्षम नसल्यास कायदेशीर पालकांना अर्ज करता येतील. त्यासाठी आेळखीचा पुरावा, निवासी पुरावा, दाेन पासपाेर्ट फाेटाे सादर करणे आवश्‍यक आहे. यापूर्वी एसएडीएम प्रणालीद्वारे दिलेले दिव्यांग प्रमाणपत्रही वैध राहणार आहेत.

जिल्ह्यात सिकलसेल आणि थॅलेसिमीयाचे रुग्ण जास्त असून, या रुग्णांना दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 अंतर्गत लाभ मिळणारच. त्याशिवाय समाविष्ट इतर रुग्णांना देखील लाभ मिळणार आहे. या अंतर्गत दिव्यांगांना शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाच्या दिव्यांग विभागामार्फत प्रमाणपत्र दिले जाईल. - डॉ. आरती कुलवाल, जिल्हा शल्यचिकित्सक, अकाेला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीत आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: विक्रोळीत सुनील राऊत आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

SCROLL FOR NEXT