गडचांदूर (जि. चंद्रपूर) : यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात 2015 पासून दारू बंदी आहे. तरीही बाजुच्या जिल्ह्यांमधून चोरट्या मार्गाने येथे नियमितपणे दारू येते. हे उघड गुपीत आहे. कधी-कधी पोलिसांना या दारू तस्करीचा सुगावा लागतो आणि दारू तस्करांच्या मुसक्या आवळत ही दारू जप्त केली जाते. अशीच घटना नुकतीच घडली. अवैध मार्गाने चालू असलेल्या दारू तस्करीच्या मुसक्या आवळत गडचांदूर उपविभागीय पोलिस विलास यामावार यांनी धडक कारवाई करीत 100 पेट्या देशी दारू जप्त केली.
सविस्तर वृत्त असे आहे की गुरुवारी दुपारच्या सुमारास नांरडा फाट्याजवळ नांदा फाट्याकडे जाणाऱ्या मार्गावर गुरुवारी दुपारी नांरडा फाटा येथून एका ट्रकमधून दारूचा साठा जात असल्याची गुप्त माहिती गडचांदूर उपविभागीय अधिकाऱ्यांना मिळताच पोलिसांनी सूत्र हलवून ट्रकचा मोठ्या शिताफीने पाठलाग केला. ट्रकची झडती घेतली असता एकूण 100 देशी दारूच्या पेट्या त्या ट्रकमध्ये आढळून आल्या.
या दारू पेट्यांची किंमत 5 लाख रुपये असल्याचे कळते. आणि त्यासोबत पकडण्यात आलेल्या वाहनाची किंमत 30 लाख असा एकूण 35 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून सदर कारवाईत आरोपी प्रकाश शालिकराव उईके उर्फ लोखंडे यांना अटक करण्यात आली असून त्यानुसार कोरपना पोलिस स्टेशनला अपराध क्र.153/ 2020 कलम 65 महाराष्ट्र दारू बंदी कायदा अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सविस्तर वाचा - शाळा सुरू पण घंटा वाजणार नाही
सदरची कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी विलास यामावर गडचांदूर यांचेसह पोलीस निरीक्षक ए. एम गुरनुले, वसंत सिडाम, प्रकाश निमकर,राम हाके, स्वप्नील बोंडे, इत्यादी पोलीस कर्मचारी यांनी यशस्वीपणे केली पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी गडचांदूर यांच्या मार्गदर्शनात पोलिस स्टेशन कोरपनाचे निरीक्षक करीत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.