मेहकर : मेहकर तालुक्यात दररोज सरासरी ५१ गुरांना लंपी साथरोगाची लागण होत असल्याने पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.आतापर्यंत १४३ गायी,बैलांचा मृत्यू झाला असून २ हजार ४५७ जनावरांना लागण झालेली आहे.त्यापैकी अनेकांची स्थिती गंभीर आहे.
सध्या २ हजार ४५७ गुरांना संसर्गजन्य लंपीची लागण झालेली असून त्यापैकी १हजार १७३ गायी तर १ हजार २८४ बैल आहेत. ७६ गायी,६७ बैल अशा जनावरांचा मृत्यू झालेला आहे.आज सोनाटी येथे एका बैल आणि गायीचा मृत्यू झाला.पंचनाम्यानंतर मृत जनावरे जमिनीत पुरण्यात येत आहेत. त्यामुळे शेतकèयांचे अतोनात नुकसान होत आहे.शेतीत यंत्रांचा वापर वाढल्याने गुराढोरांची संख्या आधीच कमी आहे.तीही साथीने मृत्यू पावत आहेत.खूप खर्च करूनही जनावरांच्या मृत्यूचे प्रमाण वाढते आहे.रोज सरासरी लागण होण्याचे प्रमाण २५ गायी आणि २६ बैल असे आहे.रोज सरासरी ७ गुरे दगावत आहेत.३७१ गुरे मध्यम तर ३४ गंभीर आजारी अशी आजची स्थिती आहे.लागण झालेल्या गुरांची रोग प्रतिकारकशक्ती कमी होत असल्याने मृत्यूचे प्रमाण अधिक आहे.
१४३ मृत्यू प्रकरणापैकी ७४ प्रकरणांचा अहवाल नुकसानभरपाई साठी वरिष्ठांकडे गेला आहे. लागण झालेल्या गुरांच्या उपचारासाठी डॉक्टरांना या गावावरून त्या गावाकडे दिवसभर जावे लागत असल्याने नुकसभरपायीचे सविस्तर अहवाल तयार करण्यासाठी त्यांचेकडे वेळच नाही. आतापर्यंत १ हजार ९४३ गुरे बरी झाली आहेत. शासनाने तातडीने वाढीव मनुष्यबळ उपलब्ध करून देणे, योग्य लसींचा, औषधांचा मुबलक पुरवठा करणे अति आवश्यक झाले आहे.
सर्व सरकारी पशुवैद्यकीय अधिकारी मोटारसायकलने फिरत आहेत.चारचाकी वाहने त्यांना दिल्यास उपचाराचे प्रमाण वाढू शकेल.तालुक्यातील दुर्गम,जंगलव्याप्त क्षेत्र मोठे असल्याने गायगवारात १४ हजार पेक्षा अधिक जनावरे आहेत.ती मोठ्या संख्येने एकत्र येत असल्याने लंपी या संसर्गजन्य रोगाची लागण प्रचंड वाढत आहे.आमच्याकडे चारा नाही म्हणून जनावरांना गायगवारात पाठविण्याशिवाय पर्याय नाही,असे सांगून शेतकरी गायगवार बंद करण्याच्या शासकीय प्रयत्नांना विरोध करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.